📢 केंद्रप्रमुख परीक्षा : अफवांवर विश्वास ठेवू नका (अधिकृत स्पष्टीकरण)
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
सध्या केंद्रप्रमुख परीक्षेच्या निकालाबाबत राज्यभर विविध चर्चा व अफवा पसरवल्या जात आहेत. अनेक शिक्षक बांधवांकडून सतत चौकशी होत असल्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्या संदर्भातील अधिकृत माहिती पुढीलप्रमाणे.
1️⃣ निकाल प्रक्रियेबाबत
केंद्रप्रमुख परीक्षेचा निकाल हा IBPS मार्फत प्रक्रिया करून दिला जातो.
साधारणपणे निकाल तयार करण्यासाठी IBPS कडून ३० ते ४५ दिवसांचा कालावधी घेतला जातो.
2️⃣ MSCE कडे निकाल प्राप्त झालेला नाही
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी IBPS ला निकाल देण्याबाबत कळविले आहे.
मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे निकाल IBPS कडून MSCE ला प्राप्त झालेला नाही.
3️⃣ कोर्टाबाबत पसरवली जाणारी अफवा
काही ठिकाणी “१ जानेवारी २०२६ पूर्वी TET पास उमेदवार कोर्टात गेले आणि त्यामुळे निकाल थांबला” अशी चर्चा पसरवली जात आहे.
ही माहिती पूर्णपणे असत्य आहे. निकाल प्रक्रियेचा या बाबीशी कोणताही संबंध नाही.
4️⃣ TET संदर्भातील मुद्दा
१ जानेवारी २०२६ पूर्वी TET पात्र असणे आवश्यक आहे या संदर्भात काही गैरसमज निर्माण केले जात आहेत.
प्रत्यक्षात TET ही Additional Qualification (अतिरिक्त पात्रता) असल्यामुळे या मुद्द्याचा निकाल प्रक्रियेशी थेट संबंध नाही.
सर्वप्रथम निकाल जाहीर होईल, त्यानंतर राज्यस्तरीय यादी (State Merit List) प्रसिद्ध होईल आणि पुढे स्कोअरकार्ड उपलब्ध होईल.
5️⃣ अफवा व चुकीच्या माहितीबाबत
काही ठिकाणी दिशाभूल करणारे संदेश,निकाल संदर्भात चुकीच्या अफवा आणि तोतयागिरी माहिती पसरवली जात आहे.आपण सर्व शासकीय सेवेत कार्यरत असलेले जबाबदार कर्मचारी आहोत, त्यामुळे अशा बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे निश्चिंत असावे ज्यांनी प्रामाणिक अभ्यास केला तेच केंद्रप्रमुख होतील.
6️⃣ संभाव्य वेळ
या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत निकाल IBPS कडून MSCE ला प्राप्त होताच त्वरित निकाल प्रसिद्ध केला जाईल असे MSCE कडून कळविण्यात आले आहे.
🔹सामूहिक भूमिका
सर्व शिक्षक बांधवांसाठी सर्वात प्रथम प्राधान्य हे केंद्रप्रमुख परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणे हेच असले पाहिजे.
त्यासाठी राज्यभरातील सर्व बांधवांशी समन्वय साधून योग्य पातळीवर पाठपुरावा केला जात आहे.
👉 त्यामुळे कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि केवळ अधिकृत माहितीचीच प्रतीक्षा करा.
✍️
राजेंद्र खैरनार व कोर टीम
महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख परीक्षा कोर टीम
केंद्रप्रमुख भरतीबाबत मा.शिक्षणमंत्र्यांची आज विधानसभेत मोठी घोषणा!
विधानसभा मोठी घोषणा!
आज विधानसभा प्रश्नोत्तरात दादा भुसे यांनी स्पष्ट सांगितले —
👉 केंद्रप्रमुख परीक्षेचा निकाल येत्या आठवड्याभरात लावला जाईल.
👉 निकालानंतर महिन्याभरात नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
शिक्षक बांधवांसाठी ही अत्यंत सकारात्मक व दिलासादायक बातमी आहे.
संयम ठेवा — आता प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम! 🙏
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2026 प्रवेश पत्र हॉल तिकीट उपलब्ध!
अधिकृत लिंक!
https://ibpsreg.ibps.in/mscepoct25/oecla_jan26/login.php?appid=3c65be7a65d2e51e2f011e327cdb21ed
जन्मतारीख टाका
Captcha टाकून Login बटन वर क्लिक करा
महत्त्वाचे : महा केंद्र प्रमुख परीक्षा 2025*
👉प्रवेश पत्रावर चिकटवलेल्या उमेदवाराचा फोटो ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेल्या फोटोशी जुळावयास हवा. तसे न झाल्यास उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. तुम्ही अपलोड केलेल्या फोटोशी तुमच्या चेह-याशी साधर्म्य हवा, चेहरेपट्टी बदलू नये.
👉उमेदवाराची प्रवेशपत्रावरील स्वाक्षरी ही आवेदन पत्रावरील अपलोड केलेल्या स्वाक्षरीशी जुळावयास हवी. यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारास सदर परीक्षेसाठी बसू दिले जाणार नाही.
👉 सद्य स्थितीत वैध अशा ओेळखीच्या पुराव्याची मूळ प्रत (नाव वर दर्शविल्याप्रमाणे जशास तसे) आणि एक छायांकित प्रत प्रवेश पत्रासोबत जोडलेली हवी. असे न आढळल्यास उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
👉परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल. परीक्षेच्या वेळी वेबसाईटवर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा यूजर आय-डी आणि पासवर्ड एंटर करावा लागेल. स्क्रीनवर दिसणारे नाव आणि इतर माहिती आपलीच आणि बरोबर असल्याची कृपया खात्री करून घ्यावी. यूजर आय-डी आणि पासवर्ड त्रयस्थ व्यक्तीला सांगितला गेल्यास जबाबदारी आणि जोखिम उमेदवाराची राहील.
👉पुढील पानांवर दिलेल्या सूचनांची प्रिंट काढा व काळजीपूर्वक वाचा.
सूचना
1.सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या स्थळात (Site) प्रवेश करण्यासाठी आपणास दिलेला यूजर आई डी / पासवर्ड नमूद करावा लागेल. संगणकाच्या पडद्यावर दिसणारे तुमचे नांव आणि इतर तपशील बरोबर आहे याची पडताळणी करावी. आपणास उपलब्ध करुन देण्यात आलेला यूजर आई डी / पासवर्ड बाबत गुप्तता पाळणे आवश्यक आहे.
2.कृपया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिकटवलेले हे प्रवेशपत्र आणि सद्य स्थितीत वैध असे मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे. प्रवेशपत्रावर असणारे नाव (ऑनलाईन नोंदणीच्यावेळी जे उमेदवाराने दिलेले असेल) व ओळखपत्रावरील नमूद असलेल्या नावाशी तंतोतंत जुळावयास हवे. विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले/मधले/अंतिम नाव बदलले आहे त्यांनी हयाची खास दखल घ्यावी. जर प्रवेश पत्रावरील फोटो/नाव आणि ओळखपत्रावरील फोटोत/नावात कोणताही फरक असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल, अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना/विवाह प्रमाणपत्र/शपथपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेस बसण्यास अनुमती देण्यात येईल.
3.बायोमेट्रिक डाटा (अंगठय़ाचा ठसा) आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल. बायोमेट्रिक डाटा च्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय (जुळतो अथवा जुळत नाही) MSCE चा असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल. बायोमैट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास/सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या :
(क)जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि परिक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.
(ख)जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (Finger prints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोटं सुकली आहेत याची खात्री करून घ्या.
(ग)दोन्ही हातांची बोट सुकलेली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पूसा.
(घ)ठसा घेतल्या जाणा-या अंगठय़ाला जर जखम/मार लागला असेल तर त्वरित परिक्षा केंद्रावर संबंधित अधिका-यास कळवा.
(या मुद्द्यांचे पालन करण्यास उमेदवार असमर्थ ठरल्यास परिक्षेस बसु दिले जाणार नाही.)
4.परीक्षेच्या स्वरुपाबद्दल माहिती/सूचना देणारी पुस्तिका (Information Handout) MSCE च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर माहिती पुस्तिका संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन त्याचे अध्ययन करावे.
5.पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत उमेदवारांनी प्रवेशपत्रावर विहित ठिकाणी त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा स्पष्टपणे उमटवावा व स्वाक्षरी करावी.
6.उमेदवाराने सोबत बॉल पॉइंट पेन आणावयाचे आहे. उमेदवार आपल्यासोबत स्वतःचे स्टँप पॅड आणू शकतात. कच्चे काम करण्यासाठी कागद पुरवला जाईल. परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेले कागद प्रवेश पत्रासह पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागतील.
7.तुम्हाला वर नमूद केलेल्या ऑनलाईन परिक्षेस बसण्यासाठी तुमचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. ची सत्यता न तपासता अनुमति देण्यात आली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी MSCE ची सर्व पात्रता व निकष पूर्ण करतो हे पडताळून बघण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची राहील.
8.बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतीबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे (उत्तरांचे) अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण केले जाईल. ह्या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पध्दतीमध्ये जर का असे अनुमान निघाले/आढळून आले की, प्रतिसादांचे आदान प्रदान झालेले आहे अणि मिळवलेले गुण हे यथार्थ/स्विकारण्यायोग्य नाहीत, तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
9.हया प्रवेशपत्रावर छापलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उमेदवारास परीक्षास्थानी यावयास हवे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
10.पुस्तके, वह्या, परिगणक यंत्र (Calculator), पेजर, मोबाईल फोन इत्यादी प्रकारची साधने/साहित्य परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतःजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. सदर नमूद केलेली अनधिकृत साधन/साहित्य परीक्षेच्यावेळी संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन/साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, याची नोंद घ्यावी.
11.परीक्षेचा दिनांक / सत्र / परीक्षा स्थान यामधील कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही.
12.सदर प्रवेशपत्र म्हणजे MSCE द्वारे प्रवेशाची हमी नव्हे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
13.उमेदवाराच्या निवडी संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय दबाव अशामुळे उमेदवारास अपात्र समजले जाईल.
14.कृपया नोंद घ्यावी की कोणताही उमेदवार परीक्षेसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो/ते. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारांना प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या दिवशी व वेळी एकदाच परीक्षेस उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो. उर्वरीत सर्व प्रवेशपत्रे उमेदवारांना परत करावी लागतील.
15.परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये ऐनवेळीस काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही. अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेहून दुसऱ्या जागेस हलविणे किंवा परीक्षेस विलंब होणे गृहित आहे. पुन्हा परीक्षा घेणे याबाबतचा निर्णय हा परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा/मंडळाचा अंतिम राहील. उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करणार नाही. या विलंबीत झालेल्या प्रक्रियेस उमेदवार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलण्यास तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेमधुन संपूर्णपणे वगळण्यात येईल.
16.परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती, संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे, प्रकाशित करणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रांसमिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण आणि जमा करणारे किंवा परिक्षा केंद्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणारे, किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
17.अपंग व्यक्तिंनी (PwBD) त्यांच्या व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परिक्षेच्या 30 मिनिटे आधी चाचणी केंद्र प्रशासकांशी संपर्क साधावा.
18.आपणास सदर परीक्षेस स्व:खर्चाने यावे लागेल आणि कोणताही प्रवास खर्च/भत्ता दिला जाणार नाही.
19.उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी “The Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024” ची नोंद घ्यावी.
*Best luck*
केंद्रप्रमुख परीक्षा ही तीन आणि चार फेब्रुवारीलाच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे...
त्यामुळे कोणत्याही चर्चेत न पडता अभ्यास करावा. आज उद्या हॉल तिकीट उपलब्ध होतीलच..
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2026 बाबत पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
परीक्षा प्राधान्य
जा. क्र. मरापप/बापवि/२०२६/२७०
दिनांक : २७/०९/२०२६
प्रति,
मा. जिल्हाधिकारी,
रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग/पुणे/सातारा/सांगली/सोलापूर, कोल्हापूर/छ. संभाजीनगर/परभणी/धाराशिव/लातूर
विषय :- जिल्हा परिषद निवडणुका दरम्यान केंद्रप्रमुख परीक्षा येत असल्याने निवडणूक प्रशिक्षणासाठी शिक्षक उमेदवारांना शिथिलता देण्याबाबत....
महोदय,
उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की, दि. ५ फेब्रुवारी, २०२
६ रोजी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद साठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिक्षण विभागातील केंद्र समन्वयक/केंद्रप्रमुखांचे तब्बल २४१० पदे रिक्त असून समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या पदांच्या भरतीसाठी राज्यभरातील ४६०६८ शिक्षक उमेदवारांची मर्यादित विभागीय स्पर्धा ऑनलाइन परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दि. ३ व ४ फेब्रुवारी, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी ज्या १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका आहेत. त्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांचा देखील समावेश आहे. जून २०२३ पासून केंद्र समन्वयक / केंद्रप्रमुख भरतीची प्रक्रिया प्रलंबित असून, तब्बल अडीच वर्षांचा विलंब या परीक्षेसाठी विविध अपरिहार्य न्यायालयीन व प्रशासकीय कारणास्तव झालेला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने गोपनीय संगणक संस्थेमार्फत राज्यभरातील परीक्षा केंद्रांवरील संगणकांच्या उपलब्धतेनुसार ३ व ४ फेब्रुवारी, २०२६ या दोन तारखा निश्चित केलेल्या आहेत. ज्या १२ जिल्हयांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या जिल्ह्यांमधील कार्यरत असलेल्या शिक्षक उमेदवारांना निवडणूक कर्तव्यामध्ये कोणतीही अडचणी येऊ नये, म्हणून दि. ३ फेब्रुवारी, २०२६ रोजी या जिल्ह्यातील उमेदवारांच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या नियोजनामुळे निवडणूक कार्यामध्ये कोणतीही बाधा येणार नसून दि. ४ फेब्रुवारी, २०२६ रोजीचे अंतिम प्रशिक्षण घेऊन या शिक्षकांना मतदान केंद्रावर जाता येऊ शकेल.
तथापि आपल्या जिल्ह्यामध्ये जर काही कारणास्तव ३ फेब्रुवारी, २०२६ रोजी निवडणुकीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले असेल, तर केंद्रप्रमुख परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना यामध्ये शिथिलता देऊन त्यांचे निवडणूक प्रशिक्षण दि.. १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात यावे अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. असे केल्याने आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या परीक्षार्थी शिक्षक उमेदवारांमुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही व त्याचबरोबर या शिक्षक उमेदवारांना परीक्षेला बसण्याची संधी मिळेल व पर्यायाने कोणतेही शिक्षक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत.
आदरपूर्वक....
डॉ.नंदकुमार बेडसे (भा.प्र.से.)
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
१) मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे - ०१
प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव :-
१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
२) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व जिल्हा परिषद यांनी आपले स्तरावरून आवश्यक कार्यवाही अग्रेनीत
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. प्रसिद्धी निवेदन
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२५
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत प्रत्येकी तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने परीक्षार्थी/उमेदवारांच्या लॉगिनमध्ये लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
तरी परीक्षार्थी/उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४,.
ठिकाण : पुणे
दिनांक २३/०१/२०२६
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
सुधारीत प्रसिद्धी निवेदन
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार असले बाबत दि.२९/०९/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते. परीक्षेबाबतची अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्च्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती.
तथापि काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षेचे आयोजन जानेवारी / फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्याचे नियोजित असून सुधारीत परीक्षेच्या तारखा यथावकाश परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
सदर परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दि.१०/११/२०२५ होती. तरी सदर आवेदनपत्र भरणेची मुदत दि.०१/०१/२०२६ पर्यंत करण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता ही दि.०१/०१/२०२६ रोजीची अंतिम समजण्यात येईल.
त्यानुसार सर्व पात्र उमेवारांनी/परीक्षार्थीनी विहीत मुदतीत आवेनदपत्र भरण्याची कार्यवाही करावी.
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - ०४
ठिकाण : पुणे
दिनांक : ४/११/२०२५
समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 साठी पात्र असलेल्या शिक्षकांनी ज्यांनी या अगोदर अर्ज भरला नाही त्यांच्यासाठी नवीन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर सुविधा ही दिनांक 25 ऑक्टोबर 2025 ते दहा नोव्हेंबर 2025 पर्यंत उपलब्ध असणार आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक.
https://ibpsreg.ibps.in/mscepoct25/
सन २०२३ रोजीच्या समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेस आवेदनपत्र भरलेल्या ज्या उमेदवारांचा मोबाईल नंबर व ई-मेल बंद असल्यामुळे UserName व Password SMS किंवा ई-मेल द्वारे मिळाला नाही अशा उमेदवारांसाठी दि. २५/१०/२०२५ ते १०/११/२०२५ या कालावधीत नवीन आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांनी नवीन आवेदनपत्र भरताच जुने भरलेले आवेदनपत्र रद्द समजण्यात येईल त्यामुळे उपरोक्त सर्व उमेदवारांनी नवीन आवेदनपत्र मुदतीत भरणे अनिवार्य आहे. जर कोणी आवेदनपत्र भरले नाही आणि परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२५ साठी सन २०२३ मध्ये आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते कि आवेदनपत्र भरताना आपण दिलेल्या मोबाईल नंबर व मेल आयडीवर आवेदनपत्र दुरुस्ती करण्यासाठी लागणारा युझर आयडी व पासवर्ड पाठविण्यात आला आहे. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात यावी.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५
शुद्धीपत्रक
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे.
तरी या कार्यालयाच्या दिनांक २९/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमधील मुद्दा क्र. (४) पात्रतेमधील
८५ ४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. ४.३ दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.”
ऐवजी असे वाचावे.
" ४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम. बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ४.३ शासन निर्णय दिनांक २९/०८/२०२५ नुसार मुद्दा क्र. (३) मधील ब) ii) अन्वये दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. "
स्थळप्रतीवर मा. आयुक्त यांची स्वाक्षरी असे.
(कैलास दातखीळ)
उपायुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४
ठिकाण : पुणे
दिनांक : १५/१०/२०२५
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 2023 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या संदर्भात पुढील प्रमाणे ईमेल व टेक्स्ट मेसेज देखील उमेदवारांना पाठवण्यात आले आहे.
सदर ई-मेल व टेक्स्ट मेसेज मध्ये उमेदवाराचा युजर आयडी व पासवर्ड आलेला आहे तो वापरून अर्जामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे.
https://ibpsonline.ibps.in/mscepapr23/
सदर लिंक फक्त लॅपटॉप किंवा पीसीवर ओपन होते.
क्लस्टर हेड पदासाठी तुमच्या अर्जाचा संदर्भ आहे ज्यासाठी MSCE, पुणे यांनी परीक्षेसाठी अर्ज मागवले होते.
१. तुमच्या अर्जात प्रविष्ट केलेल्या काही परवानगीयोग्य तपशीलांमध्ये बदल करण्यासाठी, कृपया MSCE, पुणे यांच्या वेबसाइटला भेट द्या. ही लिंक ०८.१०.२०२५-१८.१०.२०२५ पासून सक्रिय असेल.
२. जर तुम्ही लॉग इन केले नाही किंवा लॉग इन केले नाही आणि कोणताही तपशील बदलला नाही, तर आधी भरलेला तपशील अंतिम मानला जाईल.
इतर सर्व तपशीलांसाठी कृपया एमएससीई, पुणे यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ने एका प्रसिद्धी निवेदनाद्वारे समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2025 बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी परीक्षार्थी/उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४,
ठिकाण : पुणे
दिनांक : २९/०९/२०२५
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः
३.१ शासन अधिसूचना दि. १८ जुलै २०२५ मध्ये नमुद केल्याप्रमाणे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेली अर्हता अनिवार्य असेल.
४. पात्रता :
४.१ फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत,
४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम. बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल.
४.३ दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल,
४.४ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी निवडीस पात्र राहील,
४.५ वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार, वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पात्र होणे अनिवार्य आहे.
अनुक्रमांक 2 मधील उपघटकांचे स्वरुपः-
उपघटक
। : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत
शासन निर्णय-
अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह) व) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र
राज्य नियमावली, 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी.
क) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005 बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिता.
ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती.
ङ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्याथ्यांसाठी विविध योजना,
उपघटक 2 : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य
UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science
Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.
उपघटक 3 : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)
अ) इंटरनेटचा प्रभावी वापर
ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे
क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)
ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान
फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब
इ) माहितीचे विश्लेषन
उपघटक 4 : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती
अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यतचा अभ्यासक्रम
ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा
क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन
ड) प्रश्न निर्मिती (स्वाध्याय) कौशल्य: ASER, NAS, PISA
फ) निकालासंबंधीची कामे
३) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र
उपघटक 5 : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन
अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण
ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे
क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.
ड) संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने
उपघटक 6 : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान
अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान
ब) चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी
क) क्रीडा विषयक घडामोडी,
७. निवड प्रक्रिया :-
७.१ लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
७.२ जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
७.३ भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.
८. परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दतः-
८.१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://www.mscepune.in या लिंकव्दारे
दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी विहित अर्हता धारण करणारे उमेदवार विहित पध्दतीने नोंदणी करून आपला
ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात,
८.२ शासन निर्णय दि. २९.०८.२०२५ अन्वये केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे नाव समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ असे संबोधण्यात येत आहे. या पूर्वी सन २०२३ मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे त्यापरीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल, त्यांना आता या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यता नाही. तथापि अशा उमेदवारांनी शासन अधिसूचना दि. १८/०७/२०२५ नुसार पात्रता मध्ये झालेल्या सुधारणेरूप सुधारीत अर्हतेची नोंद करणे आवश्यक राहील. या उमेदवारांसाठी अर्हता इ. बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारीत करण्यासाठीची सुविधा या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत उपलब्ध राहील, याची यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
८.३ या पूर्वी सन २०२३ मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर परीक्षेसाठी ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने ई-मेल वर अर्ज/माहिती सादर केलेली आहे, त्यांनी देखील विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील. तसेच आवेदनपत्रामधील समाविष्ट केलेल्या सुधारीत मुद्यांची माहिती भरणे आवश्यक राहील.
(संबंधित उमेदवारांचे यापूर्वी परीक्षेचे शुल्क जमा केलेले आहे. त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल.)
८.४ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
८.५ ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील,
(अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (4.5 सेमी X 3.5
सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 200 X 300 pixels
फाईल साईज 20 kb - 50 kb
(ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी
अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 140 X 60 pixels
फाईल साईज 10kb - 20 kb
(क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी X ३ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे.
ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी,
आकारमान 240 X 240 pixels in 200 DPI
फाईल साईज - 20 kb - 50 kb
(ड) शासन अधिसूचना दि. 18/07/2025 मुद्दा क्र. 4 (1) अन्वये केद्रप्रमुख पदापवर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, 2005 मधील तरतुदींनुसार किंवा त्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य नियम, आदेश किंवा इतर संसाधनानुसार नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक राहील,
उपरोक्त लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन व स्वःघोषणा प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याची स्कैन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले, आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. (लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)
(इ) स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील उपरोक्त दोन्ही प्रतिज्ञापत्र (१० सेमी X ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये लिहीलेले) एकाच कागदावर अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 800 X 400 pixels in 200 DPI
फाईल साईज 50 kb - 100 kb
९. परीक्षेचे शुल्क :
१. सर्व संवर्गातील उमेदवारः रु. ९५०/-
२. दिव्यांग उमेदवारः रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील,
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.
१०. जिल्हा / परीक्षा केंद्र निवडः जिल्हा परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा/ परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.
११. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी :-
१२. सर्वसाधारण :-
१२.१ अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वतःचा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
१२.२ ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
१२.३ "प्रस्तुत परीक्षे करीता अर्ज विचारात घेण्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसे गटशिक्षणाधिकारी यांनी अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर ५ दिवसाचे आत परीक्षा परिषदेस कळविणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरीता अर्ज विचारात घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा परिषदेस तसे कळविण्याची आवश्यकता नाही." असेही उमेदवाराने संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना कळवावे.
१२.४ प्रस्तुत परीक्षा ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा (Qualifying Examination) नाही.
१२.५ परीक्षेच्या निकालाच्या आधारे परीक्षा परिषदेकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पात्रता सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासली जाईल. सदर परीक्षेमधील उमेदवाराच्या कामगिरीच्या (Performance) आधारे नियुक्ती मागण्याचा उमेदवारास कोणताही हक्क असणार नाही.
१२.६ परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराने राजीनामा दिल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास अथवा सक्षम प्राधिकारी यांनी सेवा समाप्त केल्यास अथवा धारणाधिकार न ठेवता संवर्गबाहय पदावर नेमणूक झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाही.
१२.७ अर्जामधील नमूद माहितीच्या आधारे जाहिरातीमधील विहित अर्हतेबाबतच्या अटींची पूर्तता करतात असे समजून पात्रता न तपासता उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षेनंतर कोणत्याही टण्यावर उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती चुकीची वा खोटी असल्याचे अथवा उमेदवार विहित अर्हतेची पूर्तता करीत नसल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल आणि त्याबाबतचा परीक्षा परिषदेचा निर्णय अंतिम राहील
१२.८ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती जाहिरात अधिकृत समजण्यात येईल. त्यामुळे उमेदवाराने वेळोवेळी परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ पहावे.
१२.९ सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
१२.१० सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास bpvmscepune2023@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल.
१२.११ कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराने विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज अचूक भरावे. जाहिरातीत दिलेल्या मुदतीनंतर याविषयी कोणतीही सबब मान्य केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
१३. प्रवेशपत्र :
१३.१ परीक्षेसाठी प्रविष्ठ होणा-या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
१३.२ परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स या पैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे, प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही नावामध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये. उमेदवारांच्या नावात बदल झालेला असल्यास त्यासंबंधित विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्राची प्रत अथवा प्रतिज्ञापत्र याची मूत्र तसेच छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
१४. परीक्षेस प्रवेश :
१४.१ फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुग्गष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सुचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षाकक्षात प्रवेश देण्यात येईल,
१४.२ स्मार्ट बीच, डिजिटल वाँच, मायक्रोफोन, मोबाईल, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणत्याही वस्तु, कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वहया, नोट्स, पुस्तके, बेंग्ज, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने/ साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतः जवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य उमेदवारांनी आणल्यास ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अथवा परीक्षा केंद्र व्यवस्थापन अथवा परीक्षा आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
१५. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती/जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.
१६. सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
१७. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास bpvmscepune2023@gmail.com या ईमेल वर संपर्क साधता येईल.
ठिकाण : पुणे :
दिनांकः २९/०९/२०२५
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्याची सुवर्णसंधी
केंद्रप्रमुख परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार; जाणून घ्या परीक्षेसाठीची आवश्यक शैक्षणिक अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व महत्वपूर्ण संदर्भ पुस्तके.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून महाराष्ट्रातील विविध *जिल्हा परिषदेत 2384 केंद्रप्रमुख पदे भरली जाणार आहेत,* त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा" या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन डिसेंबर 2023 मध्ये करण्यात आले आहे.
अर्ज भरण्याचा कालावधी
केंद्रप्रमुख परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दि. ०१/१२/२०२३ ते ०८/१२/२०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती www.mscepune.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
IBPS कंपनीकडून नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्यासाठी आपली गुणवत्ता सिध्द करावी लागणार आहे.
शासन निर्णय 27 सप्टेंबर 2023 नुसार विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सुधारित नवीन अर्हता.
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
आता सुधारित अर्हतेनुसार 50 वर्षे पेक्षा अधिक वय असलेले तसेच ज्यांना पदवीला 50 टक्के पेक्षा कमी गुण असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकही अर्ज करू शकणार आहेत.
केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन - 4400
केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी.
केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
केंद्रप्रमुख पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.
पेपर क्रमांक एकमध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ
1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स
2. केंद्रप्रमुख पेपर पहिला बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर
3.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)
5.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते
पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4.अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5. माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6. विषयज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7.संप्रेषण कौशल्य - 15 गुण
एकूण - 100 गुण
केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ
1.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स (तिसरी आवृत्ती)
सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.
2.केंद्रप्रमुख पेपर दुसरा नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षणशास्त्र घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.एस.कमल व स्वाती शेटे *(वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या सरावासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ)*
3.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र-डॉ.ह.ना.जगताप (पाचवी आवृत्ती)
4.शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह- डॉ.ह.ना.जगताप
5. शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
Best of Luck
(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.














1 Comments
I want k.p.exam book.
ReplyDelete