महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई. कार्यालयाने दिनांक 5 जून 2026 रोजी विद्यार्थ्यांसाठी बॅच व ओळखपत्र साठी निधी वितरणाबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई..
मप्राशिप/PM SHRI/लेखा/Badge & ID-(PM SHRI-School)/२०२६-२७/1992
05 JUN 2026
-: कार्यालयीन आदेश:-
PM SHRI योजनेतंर्गत सन २०२६-२७ मध्ये मंजूर झालेल्या कृती आराखड्यानुसार पीएमश्री ८६० शाळांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - NEP २०२० च्या घटकांनुसार शाळांमध्ये सुलभ अंमलबजावणी करावयाची आहे. त्यानुषंगाने सन २०२६-२७ मध्ये PM SHRI योजनेतंर्गत ८६० शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बॅच व ओळखपत्र PM SHRI logo for all students like Badge and ID प्रति विद्यार्थी रू.१००/- याप्रमाणे ३०४००३ विद्यार्थ्यांसाठी रक्कम रु.३,०४,००,३००/- (रू. तीन कोटी चार लक्ष तीनशे फक्त) इतका निधी जिल्हा व महानगरपालिका स्तरावर Child Limit Recurring - GEN, SC, ST (आवर्ती) साठी Withdrawal limit SNA-SPARSH प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे. (सोबत विवरणपत्र)
जिल्हा परिषद व महानगरपालिका निहाय वितरित केलेल्या निधीचा तपशील सोबत जोडण्यात येत आहे. जिल्हा परिषद व महानगरपालिका यांनी देखील सदर निधीचे वितरण Withdrawal limit SNA-SPARSH प्रणालीद्वारेच करणे आवश्यक आहे. मंजूर तरतूदी नुसार वितरित केलेला निधी विचारात घेऊन खर्च दिलेल्या कार्यक्रमावरच करावयाचा आहे. प्रकल्प मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तातील सूचना, FMP Manual व इतर लागू असलेले नियम यांचे पालन करून व आवश्यक मंजूरी घेऊन खर्च करण्यात यावे. निधी प्राप्त होताच त्याची पोच या कार्यालयास तातडीने देण्यात यावी.
सोबत : विवरणपत्र.
(देविदास कुलाळ)
सह संचालक (प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव अग्रेषित :
१) मा. आयुक्त महानगरपालिका, (सर्व)
२) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, (सर्व)
४) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, (सर्व)
प्रत माहितीस्तव :-
१) उपसंचालक (प्रशा/ प्रकल्प), मप्राशिप, मुंबई
२) समन्वयक (लिंग समभाव), मप्राशिप, मुंबई
वरील संपूर्ण आदेश विवरण पत्रासह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏


0 Comments