बदली अपडेट् 2023 - ज्यांनी अंतर जिल्हा बदली साठी यापूर्वी अर्ज केला नाही त्यांचा देखील बदली प्रक्रियेत समाविष्ट होण्याची संधी!

 महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा परिषद शिक्षक अंतर जिल्हा बदली संदर्भात न्यायालयीन याचिकेनुसार पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. 


रिट याचिका क्र.६६८३/२०२३

श्री. शशिकांत चापेकर, अध्यक्ष, शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य व इतर १३८ विरूध्द महाराष्ट्र शासन व इतर.

विषयांकित रिट याचिकेतील याचिकाकर्ते हे वेगवेळया जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षक आहेत. शासन पत्र दि.२३.०८. २०२३ मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे याचिकाकर्त्यांना सन २०२३ मधील आंतरजिल्हा बदलीप्रकियेत नव्याने अर्ज भरण्याची संधी देण्याची व दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया राबविण्याची याचिकाकर्त्यांची विनंती आहे. तसेच ज्या शिक्षकांचे सन २०२२ मध्ये अर्ज सादर केल्यानंतर आता संवर्ग बदल झाला आहे अशा शिक्षकांना नव्या संवर्गातून अर्ज


भरण्याची संधी देण्यात येण्याची विनंती केली आहे. २. विषयांकित रिट अनुषंगाने खालील वस्तुस्थिती मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती.

१. शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांची संख्या सुनिश्चित करणेसंदर्भात तसेच, रिक्त पदांवर नियुक्ती देत असताना काही सुधारित अटी लागू करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाकडून दि.२१.०६.२०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. सदर शासन निर्णयामध्ये ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची सन २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झाली आहे. तथापि, सन २०२२ मधील आंतरजिल्हा बदलीसाठी विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी, असे निर्देश दिलेले आहेत.


२. शालेय शिक्षण विभागाच्या सदर शासन निर्णयास अनुसरुन सन २०२२ मधील आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही अशाच शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज विचारात घेऊन बदलीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर बदलीप्रक्रिया ही सन २०२२ ची असल्याने यात नवीन बदली अर्जाचा विचार करण्यात आलेला नाही. सन २०२३ साठीची बदलीप्रक्रिया सुरु झाल्यानंतर सन २०२३ मध्ये बदलीसाठी विनंती केलेल्या बदलीपात्र शिक्षकांचा बदलीप्रक्रियेमध्ये विचार करण्यात येईल.

वेषयांकित याचिकेच्या अनुषंगाने उपरोक्त बाबी मा. न्यायालयाच्या निदर्शनात आणण्यात यावी, ही विनंती.


आपला,

( पो.दे.देशमुख )

उप सचिव, महाराष्ट्र शासन.



आंतर जिल्हा बदली हळूहळू कायमची बंद होण्याची चिन्ह दिसत असताना शेवटची संधी म्हणून 2022 मध्ये राबविण्यात आलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज केले होते त्यांची सेवानिष्ठता यादी लावून संबंधित जिल्हा परिषदेत रिक्त पदा नुसार त्यांची आंतर जिल्हा बदली करण्याचे निर्देश या अगोदर शासन निर्णयानुसार देण्यात आले होते. 

परंतु सदर प्रक्रियेमध्ये नवीन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ज्यांनी 2022 मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये अर्ज सादर केले नव्हते अशा शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयीन निर्णयानुसार आता नवीन शिक्षकांना देखील आंतरजिल्हा बदलीची संधी उपलब्ध होणार आहे असे वरील शासन निर्णयानुसार स्पष्ट होते. 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.