UDISE PLUS 2025-26 New Update -२०२५-२६ यु-डायस प्लस प्रणाली महत्त्वाचे 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ!

Udise plus 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ! 

UDISE+ data entry period has been extended beyond 30th September and will remain open till 31st October.

"UDISE+ डेटा एंट्री का कार्यकाल ३० सप्टेंबरच्या पुढे वाढवण्यात आला असून तो ३१ ऑक्टोबरपर्यंत खुला राहील."  

Udise Portal वरील सूचना! 


MPSP ने २६ सप्टेंबर २०२५ रोजी सन २०२५-२६ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची अंतिम माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने पाठविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 

संदर्भ: १) केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No. २३-२/२०२५-Stats दि. ३०/०४/२०२५.

२) जा.क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/U-DISE/२०२५-२६/२१२४ दि. १८ जुलै, २०२५ रोजीच्या मार्गदर्शक सूचना.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भिय पत्र क्र. १ व २ नुसार जिल्ह्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनांच्या इयत्ता पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व शाळांची सविस्तर माहिती शाळास्तरावरून यु-डायस प्लस https://udiseplus.gov.in/ प्रणालीमध्ये दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत भरण्यासाठी कळविण्यात आले आहे.

सदर प्रणालीमधील माहितीच्या आधारे समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, मुलींकरिता स्वच्छतागृह, विद्यार्थी आरटी २५% प्रवेश, संचमान्यता, शैक्षणिक निर्देशांक (PGI), विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक शिक्षण, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक सोयी सुविधा इ. याच माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून मंजूर करण्यात येत आहे. सन २०२५-२६ या वर्षापासून यु-डायस प्लस प्रणाली व सरल प्रणालीचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. तथापि, शाळांमध्ये शैक्षणिक सोयी सुविधा व गुणवत्ता वाढविण्याकरिता या प्रणालीमधून प्राप्त होणारी माहिती वस्तुनिष्ठ असणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण स्वतः प्रणालीमधून प्राप्त होणारी माहितीचे सादरणीकरण घ्यावे, यामध्ये प्रामुख्याने शाळांमध्ये इमारत, वर्गखोली, मुला व मुलींकरिता स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, किचन शेड, रॅम्प, क्रिडांगण, स्वरक्षण भिंत या सर्व भौतिक सुविधा असल्याबाबत खात्री करावी, तसेच विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करून घेणे, विद्यार्थ्यांचे अपार आयडी पूर्ण करून घेणे, ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थी शून्य करणे, दुबार नोंदणी झालेले विद्यार्थी यु-डायस प्लस प्रणालीमधून काढणे, आरटीई २५% नुसार प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंद झाल्याची खात्री करणे इ. बाबीं.

जिल्हा स्तरावर यु-डायस प्लस प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक या माहितीतील सर्व त्रुटींची पूर्तता करून प्रमाणपत्र यु-डायस प्लस प्रणालीमध्ये आपल्या स्वाक्षरीचे अपलोड करण्यासाठी संबंधितांना आदेशित करावे, तसेच त्या प्रमाणपत्राची एक पत्र या कार्यालयास ई-मेलद्वारे पाठविण्याकरिता सूचित करावे.


(संजय यादव, भा.प्र.से.)

राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.


26 SEP 2025

प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक),
जिल्हा परिषद, सर्व.

विषयः यु-डायस प्लस प्रणालीमधून दुबार नोंदणी (Duplicate) विद्यार्थ्यांचा शोध घेवून Dropbox मध्ये टाकण्याबाबत.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने दि. २४ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये १४५७१ एवढे विद्यार्थी शाळांमध्ये दुबार नोंदणी (Duplicate) झाली असल्याचे दिसून आले. सदर विद्यार्थ्यांचा शोध घेवून दुबार नोंदणी झालेले विद्यार्थ्यांची माहिती काढण्यासाठी जिल्हानिहाय विद्यार्थ्यांची यादी सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तात्काळ आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना दुबार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती Dropbox मध्ये टाकून Inactive करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे.

सोबत : दुबार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी.

 राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशा.) 
म.प्रा.शि.प., मुंबई.


दिनांक : 26 SEP 2025
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक),
जिल्हा परिषद, सर्व.

विषयः सन २०२५-२६ या वर्षामध्ये यु-डायस प्लस प्रणालीतील Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी कमी करणेबाबत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने दि. २४ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या Dropbox अहवालानुसार राज्यामध्ये ९२७०४१ एवढे विद्यार्थी Dropbox मध्ये दिसून येत आहे. सदरचे विद्यार्थी सन २०२४-२५ या वर्षामध्ये शाळांमध्ये शिक्षण घेत होते. सन २०२५-२६ या वर्षामध्ये विद्यार्थीनी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्या शाळेमध्ये Dropbox मधून Import करून घेणे आवश्यक आहे, जेणे करून विद्यार्थ्यांचे दुबार नोंदणी होणार नाही.
शाळानिहाय Dropbox मधील विद्यार्थ्यांची माहिती Import करून घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तात्काळ आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना Dropbox मधून प्रवेश घेतलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला Import करून घेण्यासाठी आदेशित करावे.
सोबत : Dropbox मधील विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी.

 गोविंद कांबळे 26/9/2025
राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रत माहितीस्तव :-
१) मा. आयुक्त शिक्षण, आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य पुणे.
३) मा. शिक्षण संचालक (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य पुणे.


लक्षवेधी, अत्यंत महत्त्वाचे

 सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख



 आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये ड्रॉप बॉक्समध्ये जे विद्यार्थी आहेत ते कमी करण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ते प्रयत्न करावे. कारण ड्रॉप बॉक्स मध्ये असलेले विद्यार्थी प्रत्यक्ष कोणत्यातरी शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांना पाठ्यपुस्तक दिले जातात. मात्र केंद्र शासनाकडून पाठ्यपुस्तकांचे अनुदान प्राप्त होताना ड्रॉप बॉक्स मधील  विद्यार्थ्यांचे गणवेश किंवा पाठ्यपुस्तकअनुदान मिळत नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तक वाटपाचा ताळमेळ लागत नाही. काही शाळांना पाठ्यपुस्तके कमी पडतात. साधारण तीन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय व अनुदानित शाळेतील ड्रॉप बॉक्स मध्ये आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे कोणतेही अनुदान केंद्र शासनाकडून प्राप्त होत नाही. तरी आपल्या शाळांमधील ड्रॉप बॉक्स ची संख्या तात्काळ शून्य करण्यासाठी ज्या शाळांच्या ड्रॉप बॉक्स मध्ये  विद्यार्थी आहेत  त्या मुख्याध्यापकांची बैठक घ्यावी. अडचणी समजून घेऊन   मुख्याध्यापकांना सहकार्य करावे. जोपर्यंत ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी कमी होणार नाहीत तोपर्यंत  केंद्र शासनाकडून नवीन विद्यार्थ्यांना यु डायस मध्ये प्रवेश देण्यास टॅब मिळणार नाही. कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी व तात्काळ पुढील कार्यवाही करावी. 

सरोज जगताप 

सहा. संचालक ( कार्यक्रम)

 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,चर्नी रोड, मुंबई


यु डायस प्लस विद्यार्थी पोर्टलवर विद्यार्थ्यांचे नाव चुकलेले असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अगोदर विद्यार्थ्याचे नाव जर दुरुस्त करायचे असेल तर त्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागत होता परंतु आता विद्यार्थ्यांची नाव दुरुस्त करण्यासाठी मुख्याध्यापक लॉगिन मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपार आयडी जनरेट करण्याअगोदर विद्यार्थ्यांची नावे तपासून त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे नाव आधार कार्ड शाळेचे रेकॉर्ड यु डायस प्लस प्रणाली या सर्व ठिकाणी सारखे राहील.






यु-डायस विद्यार्थी पोर्टलवर पहिल्या वर्गाचे विद्यार्थी पोर्टलवर घेण्यासाठी टॅब उपलब्ध झाली आहे. 


Udise sdms Student Portal Link

https://sdms.udiseplus.gov.in/p0/v1/login?state-id=127

सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे Promotion करणेबाबत. https://udiseplus.gov.in/

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून यु-डायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

दि. २२ जून, २०२४ पासून ऑनलाईन पध्दतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे Promotion करण्याच्या अनुषंगाने प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच इतर शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना Import करण्याची सुविधा उपलब् दिली आहे. 1/2

दि. ०१ जुलै, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार ५३.९०% विद्यार्थ्यांचे Promotion पूर्ण झाले आहे. तरी आपल्या स्तरावरून सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे Promotion मुख्याध्यापकांमार्फत लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी संबंधितांना कळवावे, जेणेकरून एकही विद्यार्थी Dropbox मध्ये राहणार नाही.


सोबत : Promotion Report.


(प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से.) 

राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई च्या दिनांक 29 जून 2024 च्या नवीन परिपत्रकानुसार प्रकल्प संचालकांनी यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करून घेणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून यु-डायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे.


दि. २८ जून, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये २३,४७,३८६ एवढे विद्यार्थी Dropbox मधुन शाळांमध्ये Import करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. यावर्षी यु-डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंतच्या वर्गामध्ये New Entry करता येणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने माहिती Transfer करून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविता येईल.

शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने Entry न करता Dropbox मधुन विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत Import करणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या Dropbox मधील Active for Import Status असलेले विद्यार्थी तात्काळ Import करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, जेणेकरून Dropbox मधील विद्यार्थ्यांची संख्या शुन्य करता येईल.



(प्रदीपकुमार डांगे, मा.प्र.से.)

राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.





SDMS पोर्टल


1. जी मुले pramotion करताना चुकून आपल्याच शाळेत pramote झालेली आहेत..

2. जी मुले शाळा सुरू असताना TC घेऊन गेलेली आहेत..

अशा मुलांसाठी सूचना..👇🏼


Transfer Certificate module चा वापर करून Dropbox मध्ये पाठवावे..

 

जेणेकरून समोरील शाळेला त्यांच्या शाळेमध्ये import करता येतील..


SDMS पोर्टल लिंक

https://sdms.udiseplus.gov.in/api/v1/login

UDISE PLUS --

 DROP BOX मधील विद्यार्थी Import कसे करावे?


Udise plus SDMS Portal - School लॉगिन केल्यानंतर Progression Module वर क्लिक करा 


Import module वर क्लिक करा


Get National code वर क्लिक करा


Aadhar No. Type करा

Date of Birth 

(आधार कार्ड वरील किंवा शाळेतील )( Date of Birth पोर्टल वरील calender मधून select करा) (जन्म तारीख चुकीची दाखवत असेल तर सन 2022-23च्या student लिस्ट मध्ये जाऊन जन्म तारीख खात्री करून घ्या किंवा पालकांनी आधार कार्ड वरील जन्मतारीख update केले आहे का तपासून घ्या)


Go वर click करा

येणाऱ्या page वर 

Class select करा

Division select करा

Admission Date type करा

IMPORT वर क्लिक करा


Page refresh करा किंवा logout करून लॉगिन करून पहा.. 

विद्यार्थी student लिस्ट मध्ये आलेला असेल. 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.