राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) - PARAKH २०२३ कार्यवाहीबाबत SCERT संचालकांचे निर्देश

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण परख 2023 च्या कार्यवाही बाबत परिपत्रक निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२३ - PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील खालील तक्त्यात नमूद केलेल्या माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करताना खालील बाबी विचारात घ्याव्यात.


• जिल्हा स्तर प्रशिक्षण :

जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांनी जिल्हास्तरावर तालुका समन्वयक व क्षेत्रीय यांचे प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे व त्याचा अहवाल जिल्हा स्तरावर तयार करून ठेवावा.

सर्वेक्षणाचे वेळापत्रक :-

१) दिनांक ०२/११/२०२३ सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेत उपस्थित राहणे व खालील पूर्वतयारी करणे.

२) आवश्यकता असेल तर नमुना तुकडी व नमुना विद्यार्थी निवड करणे व त्याना ID क्रमांक देणे.

३) विद्यार्थी बैठक व्यवस्था पडताळणी व पूर्वतयारी करणे. (हवेशीर व विद्यार्थ्यांना योग्य उंची नुसार बेंच, व इतर सुविधा)

४) हजेरी पत्रकातील नोंदी यांची प्रत मिळविणे, TQ प्रश्नावली साठी शिक्षक निश्चिती करणे.


दिनांक ०३/११/२०२३

खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार शाळा स्तरावर क्षेत्रीय अन्वेषकांमार्फत कार्यवाही करावी.


२) जिल्हास्तरावरील इतर क्षेत्रीय अधिकारी यांच्या शाळाभेटीचे नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व योजना यांनी एकत्र येऊन करावे. जेणेकरून एकाच शाळेला अनेक अधिका-यांच्या भेटी होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येईल.

३) सदर शाळा भेटी करताना विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शाळा भेटीचा अहवाल भरून त्याचे जिल्हा स्तरावर संकलन करून घ्यावे.


• सर्वेक्षण साहित्य वितरण :

१) सर्वेक्षण साहित्याचे वितरण दिनांक २६/११/२०२३ पासून सुरू होत आहे. जिल्हास्तरावर इयत्ता निहाय व शाळा संख्यानुसार (या पत्रासोबत देण्यात आलेल्या जिल्हानिहाय / तालुकानिहाय / शाळानिहाय) शाळांचे गड्ढे ताब्यात घेण्यात यावेत. इयत्ता तिसरी, इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी असा इयत्तांचा प्रत्येकी एक गठ्ठा करण्यात आलेला आहे. त्याचे विवरण या पत्रासोबत देण्यात येत आहे. २) तसेच जिल्ह्यांना पुरविण्यात आलेल्या गठ्यांमध्ये इयत्तानिहाय सर्वं बुकलेट्स (प्रश्नपत्रिका ), PQ प्रश्नावली, SQ प्रश्नावली व TQ प्रश्नावली एकत्रच आहेत तसेच याच गठ्यांमध्ये बुकलेटच्या (प्रश्नपत्रिकाच्या ) ३५ OMR, PQ घ्या ३० OMR, SQ च्या ०२ OMR TQ ची ०१ OMR आहेत. तसेच सर्वेक्षणानंतर साहित्य संकलन करणेसाठी ०२ रिकामे पाकिटे देण्यात आले आहेत.


३) साहित्य संकलनासाठी जी दोन रिकामी पाकिटे देण्यात आलेली आहेत त्यामध्ये सर्वेक्षणानंतर संकलन करावयाच्या साहित्याचा तपशील की जो जिल्हास्तरावर जमा करण्यात येणार आहे:-

रिकाम्या पॉकेटमध्ये पॉकेट क्रमांक ०१ मध्ये भरलेल्या (Used) OMR म्हणजेच बुकलेटच्या (प्रश्नपत्रिका) AT OMR घालाव्यात.

पॉकेट क्रमांक ०२ मध्ये PQ, SQ च TQ च्या भरलेल्या OMR तसेच फिल्ड नोट (Field Note घालाव्यात > तसेच न वापरलेल्या OMR प्रश्नावल्या (PQ, SQ व TQ) BOOKLET व वापरलेल्या booklet व खराब OMR इत्यादी सर्व सर्वेक्षण साहित्य एका गठ्ठयात बांधाव्यात व त्याही जमा कराव्यात.

तालुका समन्वयक यांनी OMR मोजून घ्याव्यात व पाकिटे सीलबंद करून जिल्हा समन्वयक यांच्याकडे जमा करावीत जिल्हा समन्वयकांनी सर्व तालुक्यांची साहित्य एकत्र करून फक्त OMR चे भरलेली पॉकेट फक्त स्कॅनिंग साठी आपणाला विभाग स्तरावर (खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे) ज्या डायटला ही जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्याकडे ही पाकिटे दि. ०४/११/२०२३ अखेर दुपारी ३.३० वाजता जमा करावीत. त्याचे नियोजन खालीलप्रमाणे असेल.


विभागांतर्गत येणारे जिल्हे

DIET, औरंगाबाद

(छत्रपती संभाजीनगर)

छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, वाशिम (एकूण १० जिल्हे)


DIET, नाशिक

पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव (एकूण ९ जिल्हे) 


DIET, नागपूर

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, अकोला -एकूण ९ जिल्हे  


SCERT, पुणे

पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर (एकूण ०८ जिल्हे)


वापरलेल्या किंवा न वापरलेल्या प्रश्नपत्रिका, OMR तसेच खराब झालेल्या OMR ह्या जिल्हास्तरावर कस्टडीमध्येच ठेवाव्यात व त्या संबंधी पुढील सूचना प्राप्त होताच योग्य ती कार्यवाही करावी.

• उपस्थिती: संदर्भ क्र. ७ नुसार दिलेल्या निर्देशानुसार

१. सर्वेक्षण कालावधीत सर्व शाळामधील विद्यार्थी १००% उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी.

२. ज्या शाळांना या कालावधीमध्ये सुट्टी आहे अशा शाळांमध्ये ज्या वर्गाची परीक्षा आहे त्या वर्गाला त्या दिवशी उपस्थित ठेवण्यासाठी सांगावे.

शाळा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरत असतील तरीही संबंधित शाळेतील निवड झालेल्या इयत्तेला सर्वेक्षण कालावधीत सर्वेक्षणाच्या दिलेल्या वेळेतच उपस्थित राहण्याबाबत निर्देश देण्यात यावेत.

सदर सर्वेक्षण संदर्भात जिल्हानिहाय संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोणातून केलेली कार्यवाही व जिल्ह्याची प्राप्त संपादणूक विचारात घेऊन सर्व जिल्हास्तरीय समन्वयक व जिल्हास्तरीय सहायक समन्वयक तसेच तालुका समन्वयक, राज्यस्तरावरील संपर्क समिती सदस्य, पर्यवेक्षीय यंत्रणा व शिक्षक यांचे गोपनीय अहवाल भरताना याची नोंद घ्यावी.


(अतोल येडगे भा.प्र.से.) 

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.