शिक्षक पदभरती-२०२२ अपडेट - शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत शिक्षण विभागाच्या नवीन सूचना

राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२२ चे आयोजन दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ या कालावधीमध्ये करण्यात आलेले होते, सदर परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर त्यांचे पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करुन घेण्यात आलेले आहेत,

तदनंतर आता राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शेक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी

 https://tait2022.mahateacherrecruitment.org.in

या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा दिनांक १६/१०/२०२३ पासून देण्यात आलेली आहे.


जाहिरात देण्यासाठी आवश्यक असणारे युजर मॅनुअल व सूचना पोर्टलवर देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच व्यवस्थापनाने त्यांच्याकडील शिक्षक प्रवर्गाची बिदूनामावली सहायक आयुक्त, मावक यांच्याकडून प्रमाणित करुन घेणे अनिवार्य आहे. सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार रिक्त शिक्षक पदांची मागणी पोर्टलवर करण्यात यावी.


पोर्टलवर जाहिराती देण्याची जबाबदारी खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाची आहे. खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाने दिलेली जाहिरात संबंधित सक्षम प्राधिकारी तपासून पोर्टलवर मान्य (Approve) करतील. खाजगी शैक्षणिक संस्थांतील जाहिरात मान्य (Approve) करताना मागासवर्ग कक्षाने मंजूर केल्याप्रमाणे भरती वर्षातील आरक्षणाची रिक्त पदे नोंद केल्याची तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदे यांची नोंद करणे आवश्यक आहे. नोंद केलेल्या विषयाचे शिक्षक अतिरिक्त नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित मान्यता देण्या-या सक्षम प्राधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक व प्रकरणपरत्वे विभागीय शिक्षण उपसंचालक यांची आहे.


व्यवस्थापनाने मान्यतेसाठी पाठविलेल्या प्रारूप जाहिरातीतील विषयाचे शिक्षक अतिरिक्त असल्यास कारण नमूद करुन सदर प्रारुप जाहिरात अमान्य (Reject) करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रारुप नाहिरातीमध्ये मागणी केलेल्या विषयाचे शिक्षक अतिरिक्त असल्यास सदर शिक्षकाचे नियमानुसार समायोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत संबंधित विषयाचा शिक्षक अतिरिक्त असताना सदर विषयास पोर्टलवरील जाहिरातीस परवानगी देऊ नये.


खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी संस्था ज्या जिल्हयामध्ये नोंदणी झालेली आहे त्या जिल्ह्याचे संबंधित शिक्षणाधिकारी यांनी पोर्टलवरील जाहिरातीस परवानगी देण्याची कार्यवाही करावी. खाजगी शेक्षणिक संस्थांना पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी दोन टप्यात कार्यवाही करावयाची आहे. १. बिंदूनामावली मान्य (Approve) करून घेणे २. बिंदुनामावली मान्य (Approve) झाल्यानंतर गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती मान्य करून घेणे.


संस्थेने बिंदूनामावली पोर्टलवर भरून संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडे फॉरवर्ड केल्यानंतर शिक्षणाधिकारी यांचे लॉगीनवर येईल. त्यानंतर शिक्षणाधिकारी पोर्टलवर व्यवस्थापनाने अपलोड केलेली बिंदूनामावलीची प्रत डाऊनलोड करुन प्रमाणित बिंदूनामावलीमध्ये नोंद असलेली पदे तसेच संस्थेने पोर्टलवर नौद केलेली आरक्षणाची रिक्त पदे व संख्या योग्य असल्याची खात्री करुन पोर्टलवर भरलेली बिंदूनामावलीची माहिती मान्य (Approve) करतील.


पोर्टलवर बिंदुनामावली मान्य (Approve) केल्यानंतरच संबंधित व्यवस्थापनास गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती भरता येईल अशी भरलेली माहिती संबंधित शिक्षणाधिकारी यांचे लॉगीनवर उपलब्ध झाल्यानंतर सदर भरलेल्या माहितीमध्ये विषयाचे शिक्षक अतिरिक्त नसल्याची खात्री करुन संबंधित व्यवस्थापनाची विषयनिहाय माहिती मान्य (Approve) करता येईल. संबंधित विषयांचे शिक्षक अतिरिक्त असल्यास संबंधित व्यवस्थापनाने भरलेली विषयनिहाय रिक्त पदांची माहिती कारणासह संबंधित शिक्षणाधिकारी यांनी अमान्य (Reject) करावी. अतिरिक्त शिक्षक असल्याने नाकारलेली पदे वगळून संस्था पुन्हा गटव विषयनिहाय रिक्त पदांची माहिती भरून पुन्हा संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडे ऑनलाईन पाठवतील. त्यानंतर भरलेली माहिती योग्य असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी मान्य (Approve) करतील.


आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदे या दोन्ही प्रकारची माहिती मान्य (Approve) झाल्यानंतर संबंधित संस्थेच्या लॉगीनवर जाहिरात जनरेट (Generate Advertisement) करण्याची सुविधा आहे, या सुविधेचा वापर करुन व्यवस्थापन जाहिरात जनरेट करु शकतील. संबंधित व्यवस्थापनाची जाहिरात जनरेट झाल्याशिवाय उमेदवारांचे प्राधान्यक्रम संबंधित व्यवस्थापनास येणार नाहीत, त्यामुळे बिंदुनामावली व गट व विषयनिहाय रिक्त पदांची अशी दोन्ही माहिती मान्य (Approve) झाल्यानंतर जाहिरात जनरेट करणे आवश्यक राहील. खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना पोर्टलवर पदभरतीकरिता जाहिरात देण्यासाठी मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह पदभरती असे दोन पर्याय आहेत. खाजगी व्यवस्थापन यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतील. तथापि, स्थानिक स्वराज्य संस्थांना मात्र मुलाखतीशिवाय पदभरती हा एकच पर्याय निवडणे बंधनकारक आहे.


आपल्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठी बिंदुनामावली प्रमाणित करण्याच्या तसेच त्यानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात देण्याची आवश्यक त्या सूचना आपल्यास्तरावरुन तात्काळ देण्याद, याव्यात.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय, (प्राथमिक) म.रा.पुणे-१


(संपत सूर्यवंशी) शिक्षण संचालक

शिक्षण संचालनालय (माध्य. व उच्च माध्य) म.रा.पुणे-१ 


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.