प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित शाळांच्या खात्यावर माहे एप्रिल २०२२ ते माहे ऑगस्ट २०२३ कालावधीतील इंधन भाजीपाला अनुदान व माहे सप्टेंबर २०२३ ते माहे डिसेंबर २०२३ कालावधीकरीता देय अनुदानाच्या ७५% अनुदान अग्रीम स्वरुपात शाळा स्तरावर वर्ग केले आहे. सदरचे इंधन भाजीपाला अनुदान आहार यंत्रणांना अदा करण्याकरीता संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये आपणास कार्यवाही करणेबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुनश्चः आपणास कळविण्यात येते की, संदर्भिय पत्र क्र. २ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार आपण स्वतः लक्ष घालून तातडीने तालुका स्तरावर विशेष शिबिराचे आयोजन करुन कार्यवाही पूर्ण करावी. योजनेंतर्गत सर्व शाळांच्या बँक स्टेटमेंट व ऑनलाईन देयकांनुसार ताळमेळ घेऊन समायोजनाची कार्यवाही करावी. संदर्भ क्र. २ चे पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही न केल्यामुळे इंधन व भाजीपाला अनुदानापासून आहार शिजविणारी यंत्रणा वंचित राहिल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
योजनेंतर्गत पात्र असलेल्या सर्व शाळांना विहित कालमर्यादेत निधी मिळण्याच्या अनुषंगाने शासन नियमानुसार MDM Portal च्या आधारे तयार झालेल्या देयकांनुसार PFMS प्रणालीद्वारे इंधन व भाजीपाल्याची रक्कम आहार शिजविणाऱ्या यंत्रणांना जिल्हा परिषद स्तरावरुन अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार माहे सप्टेंबर २०२३ कालावधीची इंधन भाजीपाला देयके आपल्या एमडीएम पोर्टलच्या जिल्हा लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदरची देयके संबंधितांना तात्काळ अदा करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन देण्यात यावेत.
तसेच यापुढील कालावधीतील प्रत्येक महिन्याचे इंधन व भाजीपाला देयके डाऊनलोड करुन नियमानुसार जिल्हा परिषद स्तरावरुन पीएफएमएस प्रणालीद्वारे देयके संबंधित शाळांच्या खात्यावर विहित कालावधीत वर्ग होईल, याची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments