वरिष्ठ वेतनश्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र कधी मिळणार/ डाऊनलोड करता येणार?

 ▪️▪️▪️▪️▪️▪️

शिक्षकांना वरिष्ठ, निवडश्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र सोमवारपासून उपलब्ध होणार - Scert समन्वयक सोनवणे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


राज्यातील हजारो प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांचे ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना येत्या सोमवारपासून प्रमाणपत्र उपलब्ध होणार असल्याचे Scert समन्वयक योगेश सोनवणे यांनी सांगितले आहे.


शिक्षकांनी विहित मुदतीत प्रशिक्षण पूर्ण केले परंतु प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड होत नसल्याने शिक्षकांची चिंता वाढली होती. आज "शिक्षकांना प्रशिक्षण प्रमाणपत्र केव्हा मिळणार" या एकमात्र मागणीसाठी वर्धा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील काही शिक्षकांनी DIET प्राचार्य मा. डॉ.श्री. घोगरे साहेब यांची जिल्हा परिषद येथील शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली व निवेदन सादर केले.


निवेदनाची दखल घेत डॉ.घोगरे  यांनी तत्काळ Scert पुणे येथील IT विभागाचे समन्वयक योगेश सोनवणे यांच्याशी चर्चा करून शिक्षकांची समस्या समजावून सांगितली. त्यावेळी सोनवणे यांनी सर्व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना येत्या सोमवार पासून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने वरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ लवकरच मिळणार आहे. यावेळी शिक्षकांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातही निवेदन दिले.


निवेदन देताना जी.एस.बावनकर, मारोती सयाम, वीरेंद्र कडू, हेमंतकुमार पारसडे, पराग शेगोकर, सौ.किरण पांडे, डॉ.नीलिमा काळे, शैलेश कुपटेकर, रुपेश नागरे, अनंत खिराळे, प्रशांत सर्याम, गजानन खराबे इ.शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.