PAVITRA - TEACHER RECRUITMENT 2022 - पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक/ शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणेसाठीच्या सूचना

 अ) सर्वसाधारण माहिती व सूचना :


१ महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीसाठी शासनाने "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२२ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.


२ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२२ दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च

२०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या चाचणीस २.३९,७३० उमेदवारांनी

नोंदणी केली होती; त्यापैकी २,१६,४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.


३ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी एकूण २०० गुणांची होती, त्यापैकी १२० प्रश्न अभियोग्यता व ८० प्रश्न बुद्धिमत्ता या घटकावर होते, प्रत्येक प्रश्नास १ गुण होता. चाचणीसाठी एकूण २ तासांचा कालावधी होता.


४ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षण सेवक / शिक्षक या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेले इयत्तांचा गट, विषय, आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे..


५ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२२ साठी प्रविष्ट झालेल्या २,१६.४४३ उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्व-प्रमाणपत्र (Self Cerfificaiton) करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठी ज्या उमेदवारांना शिक्षण सेवक / शिक्षक या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे


आहे. त्या सर्व उमेदवारांना या पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाण पत्र (Self Certificaiton) तयार करणे बंधनकारक आहे.


६ उमेदवारांना त्यांचे स्व प्रमाणपत्र (Self Certificalton) करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी TAIT चाचणी नोंदणी क्रमांक (Registration Number), बैठक क्रमांक (Roll Number), नोंदणीकृत मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत असणे आवश्यक आहे.



पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून रिक्त पदांची इयत्तांचा गट, विषय व आरक्षणनिहाय, व्यवस्थापननिहाय रिक्त पदांची माहिती दर्शविणारी संक्षिप्त

जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल.


८ स्थानिक स्वराज्य संस्थाकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची (१:१ या प्रमाणात ) नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस करण्यात येईल.


९ खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील असतील. यापैकी कोणताही एक प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थापनास असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची (१:१ या प्रमाणात ) नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस करण्यात येईल. मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी तीन उमेदवाराची (१:३ या प्रमाणात) मुलाखतीसाठी पोर्टल मार्फत शिफारस करण्यात येईल.


१० शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ या चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक १२ / ०२ / २०२३ असा होता, त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिनांक १२/२/२०२३ अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. शासन पत्र संकीर्ण-२०२२ / प्रक्र ७०/टीएनटी-१ दिनांक ६/२/२०२३ अन्वये CTET - December २०२२ ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - २०२२ या चाचणीसाठी प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली होती. CTET - December २०२२ या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल दिनांक १०/४/२०२३ रोजी घोषित झाला आहे, यास्तव केवळ CTET- December २०२२ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सदर अर्हता विचारात घेतली जाईल.


११ उमेदवाराची दिनांक १२/२/२०२३ अखेरपर्यंत धारण केलेली अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट व विषय याचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्याच्या लॉगीनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापननिहाय यादी उपलब्ध होईल. सदर रिक्त पदांच्या यादीतून उमेदवाराने निवडलेले प्राधान्यक्रम (Locked preferences) निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील.


१२ जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट व विषय, उमेदवारानी निवडलेले प्राधान्यक्रम (Locked preferences) याचा गुणवत्तेनुसार एकत्रित विचार करून त्या त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल.


१३ त्या त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर सबंधित व्यवस्थापन त्यांची स्व-प्रमाणपत्राच्या वेळी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करतील.




आ) स्व- प्रमाणपत्राबाबत सूचना:


अर्जात म्हणजेच स्व-प्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा पाठविलेल्या दाखल्याच्या प्रतीतील नोंदीमध्ये अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे. तसेच विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे अथवा गैर वर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा इतर योग्य अशा शिक्षेस पात्र ठरेल.


१. उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करण्यापूर्वी स्वत:ची नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. ही नोंदणी (Registration) करण्यासाठी Register Here येथे क्लिक करून तेथे आपला टेट २०२२ चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन क्रमांक नोंद करावा. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा. उमेदवारांचा टेट २०२२ चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन आयडी (log In ID) असेल


२. पवित्र पोर्टल वरील नोंदणी (Registration) व स्व प्रमाणपत्र (Self certification) भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे. ३. अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवाराने नोंदणी (Registration) व स्व-प्रमाणपत्र (Self certification) साठी आवश्यक माहिती इंग्रजीमध्ये capital letters मध्ये भरावी. संक्षिप्त (Abbrivations) अथवा आद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. उमेदवाराने स्वतःचे नाव, वडिलांचे / पतीचे नाव आडनाव यामध्ये एक स्पेस सोडावी तसेच पत्ता लिहिताना इमारतीचे नाव रस्त्याचे नाव इत्यादीमध्ये एक स्पेस सोडावी.


४. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसंदर्भात स्व-प्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा ती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केल्याचा दिनांक मानण्यात येईल. 

५. संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक १२ / २ / २०२३ अखेरपर्यंत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तथापि CTET-December २०२२ ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सदर अर्हता विचारात घेतली जाईल. 

६. ज्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणांमुळे राखून ठेवला असेल आणि असा राखून ठेवलेला निकाल दि. १२/०२/२०२३ नंतर जाहीर झाला असेल उमेदवाराने विहित मुदतीत अर्हता धारण केली असे मानण्यात येणार नाही.


७. उमेदवाराने पत्र व्यवहाराचा स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये अचूक नमूद करावा. ८. उमेदवाराचे वय, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, आरक्षित प्रवर्ग (असल्यास), उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू तसेच अनाथ इत्यादी संदर्भात न चुकता निःसंदिग्धपणे / निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. तसेच उमेदवार एकापेक्षा जास्त दावे करू इच्छित असल्यास तसे स्पष्टपणे स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद करावे.


९. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२२ यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादी बाबी नमूद केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे कडील सदर चाचणीची सुधारित अधिसूचना दिनांक ७/२/२०२३ अन्वये उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्र प्राप्त करण्यासाठी दिनांक ३१/३/२०२३ अखेरपर्यंत दिलेली मुदतवाढ लक्षात घेता उमेदवारास सद्य:स्थितीत कागदपत्रे प्राप्त असल्यास प्रवर्ग व समांतर आरक्षण विषयक बदल करता येतील. ज्या उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - २०२२ च्या वेळी अर्जामध्ये दिव्यांगत्वाचा दावा केला आहे, अशा उमेदवारांना त्यांच्या दिव्यांगत्वाचा दाव्यामध्ये कोणत्याही कारणास्तव बदल करता येणार नाही.


१०. आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला वगळून) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non creamy layer) प्राप्त असणे आवश्यक आहे.


११. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवाराकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तथापि या प्रवर्गातील उमेदवारांकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले (केवळ महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेले आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र (केंद्रीय सेवांसाठी लागू असलेले ) या शिक्षक पदभरती साठी लागू राहणार नाही.


१२. उमेदवारांनी वेळोवेळी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे त्यांना निवडीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येईल, स्व-प्रमाणपत्रामध्ये पात्रतेविषयक माहिती मूळ कागदपत्र/प्रमाणपत्रांच्या आधारे संबंधित व्यवस्थापनाकडून तपासण्यात येईल व मूळ कागदपत्रांच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवाराची निवड करण्यात येईल. अन्यथा अपात्र उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व असा उमेदवार योग्य त्या कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल.


१३. नियमानुसार नियुक्तीसाठी पात्र असणारा उमेदवार अध्यापन करण्यास शारीरिक व मानसिक दृष्ट्या पात्र असल्याचे सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.


१४. सदरहू शिक्षण सेवक/ शिक्षक पदभरतीसाठी राज्यातील कोणत्याही कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच अशासकीय व्यक्ती यापैकी कोणाचीही अभिकर्ता/ माध्यम म्हणून नियुक्ती केलेली नाही. नोकरी मिळवून देतोअसे सांगून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती / तोतया व्यक्तींपासून अर्जदारानी सावध राहावे.

 १५. उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पद भरतीशी निगडित असलेले विविध शासन निर्णयाचे काळजीपूर्वक वाचन करून स्व-प्रमाणपत्रातील माहिती भरावी.


१६. पवित्र पोर्टलवर स्व प्रमाणपत्रामध्ये संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर निवडप्रक्रियेसंदर्भातील पुढील कोणतीही कार्यवाही केव्हा होणार याबाबत उमेदवाराने सतर्क राहणे आवश्यक आहे. निवडप्रक्रियेसंबंधीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर याबाबतच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.


संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


पवित्र पोर्टल नवीन लिंक.

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Notifications.aspx?NotificationCategoryID=4


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.