वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 महत्त्वाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करताना येणाऱ्या अडचणी बाबत स्पष्टीकरण

 वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे.


ज्या प्रशिक्षणार्थी यांनी वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण १००% पूर्ण केले आहे त्यांनी 

https://training.scertmaha.ac.in/Certificate2023/

या लिंक वर जाऊन आपले प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे.


1. प्रस्तुत प्रमाणपत्र एकदाच बदल करता येणार आहे.

 म्हणून सर्व माहिती व्यवस्थित वाचून भरा.


२.प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता व्यवस्थित भरल्याची खात्री करा.


३. आपल्यास हवा असलेला प्रशिक्षण गट व प्रकार योग्य असल्याची करा. प्रशिक्षण प्रकार व गट चुकला असल्यास प्रमाणपत्र डाऊनलोड करू नका. 


४. या कार्यालयाशी संपर्क साधून योग्य बदल करून घ्या.


५. एकदा चुकलेले प्रमाणपत्र पुन्हा दुरुस्ती करून मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.


६. प्रशिक्षण १००% पूर्ण करूनही डाऊनलोड साठी प्रमाणपत्र  उपलब्ध न होणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी गोंधळून जावू नये. त्यांना 2 आठवड्यात प्रमाणपत्र प्राप्त होईल.


अमोल येडगे, भा. प्र. से.

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे.



ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणाली 

ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.

  1. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.
  2. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
  3. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.
उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे.
प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक १ सप्टेंबेर २०२३ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.


प्रमाणपत्र वितरण
 
  1. आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
  2. आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास
    • नोंदणी क्रमांक
    • इंग्रजी मधील आपले नाव
    • मोबाईल क्रमांक
    • ईमेल
    • प्रशिक्षण गट
    • आपले मराठीतील नाव
    • शाळेचे नाव
    • जिल्हा
    • तालुका
  3. यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.
  4. उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.
ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.

प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.