PAVITRA Portal Teachers Recruitment 2022 Update - स्व- प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक अखेर मुदतवाढ!

 आज दिनांक १४/९/२०२३ रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या प्रेस नोट नुसार.



महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीसाठी शासनाने “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - २०२२" या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती; त्यापैकी २,१६,४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.


ही चाचणी दिलेल्या उमेदवारांना दिनांक १/९/२०२३ ते दिनांक १५/९/२०२३ या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा दिलेली आहे.


तथापि राज्यातील काही भागामध्ये इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु नाही तसेच दिनांक १४/०९/२०२३ रोजी पोर्टल स्व-प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता दिलेल्या मुदतीत पूर्ण होणार नाही, ही बाब विचारात घेता स्व- प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक २२/०९/२०२३ अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे.


तसेच हे प्रमाणिकरण करीत असताना अथवा पोर्टल संदर्भात इतर कोणतीही शंका असल्यास किंवा अडचणी येत असल्यास edupavitra२०२२@gmail.com या ईमेल पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा. त्यास यथाशीघ्र उत्तर देण्यात येईल यासाठी कोणाही कर्मचारी अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये.


वर नमूद केलेल्या कालावधीत जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत ते उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत.


यास्तव “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२” ही चाचणी दिलेल्या उमेदवारांनी https://tait२०२२.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन दिनांक २२/०९/२०२३ अखेर आपली कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

अर्थात आता







महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.