बदली अपडेट - आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू! सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलांबाबत वेळापत्रक बाबत ग्राम विकास विभागाचा शासन आदेश

 

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ व दि. २३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या आहेत.. २. आता शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि. २१/०६/२०२३ च्या शासन Installation सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देशआहेत. त्यानुषंगाने सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते. मात्र, रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती. फक्त अशाच सन २०२२ च्या बदली प्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु आज करण्यात येत आहे. सदर बदली प्रक्रियेकरीता E.D. लॉगीन मध्यरात्री पासून सुरु करण्यात येणार असून मंजूर केलेली बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी दि.१४/०९/२०२३ ते दि. १७/०९/२०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावी.


आपला.


(पो.दे. देशमुख)


उप सचिव, महाराष्ट्र शासन



वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.