पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्व प्रमाणपत्र टप्प्याटप्प्याने स्वतःच्या मोबाईल वरूनच कसे ऑनलाईन पूर्ण करावे?

PAVITRA PORTAL TEACHERS RECRUITMENT 2022 Self Certification Process On Own Mobile Easy Steps

 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवरून सर्व प्रमाणपत्र करण्यासाठी खालील प्रमाणे आपल्या मोबाईल वरून देखील संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया करता येऊ शकते.


त्यासाठी सर्वप्रथम पुढील लिंक वर क्लिक करा.

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx


वरील लिंक वर टच केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल..


विंडो मधील हिरव्या रंगाच्या लॉगिन बटन खालील Register Here या निळ्या रंगाच्या अक्षरांवर क्लिक करा. 

तुम्हाला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 च्या गुणपत्रकावरील रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर यांची आवश्यकता पडेल. पुढील प्रमाणे विंडो ओपन झाल्यानंतर Tait Roll Number च्या ठिकाणी गुणपत्रकावरील रोल नंबर टाकावा व त्यानंतरच्या चौकटीत रजिस्ट्रेशन नंबर टाकावा त्यानंतर खाली दिलेल्या लाल रंगाच्या Check TAIT Details वर क्लिक करावे दोन्ही चौकटीत दिलेली माहिती योग्य असल्यास तुम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी दिलेली माहिती ओपन होईल.

 


व त्याखाली तुम्हाला तुमचा फोटो व सही वेगवेगळी अपलोड करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करण्याचे ऑप्शन मिळेल आपल्या सोयीनुसार पासवर्ड सेट करावा व तुमचा युजर आयडी म्हणजेच तुमचा डेट परीक्षेचा रोल नंबर असेल.


त्यानंतर तुम्ही पुन्हा सुरुवातीची लिंक ओपन करून आता त्यामधील लॉगिन आयडी पासवर्ड व कॅपच्या कोड टाकून पोर्टलवर लॉगिन करा.

लॉगिन करताना आपल्याला युजर आयडी पासवर्ड कॅपच्या कोड टाकून झाल्यानंतर पुन्हा मोबाईल वरील ओटीपी व कॅपच्या कोड टाकून त्यानंतरच लॉगिन यशस्वी होईल.

लॉगिन केल्यानंतर आपण स्टेट परीक्षेसाठी दिलेले सर्व माहिती ओपन होईल त्यामधील माहितीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास तो बदल करून सेव आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा.

त्यानंतर आपण टेट परीक्षेसाठी दिलेला आपला पत्ता ओपन होईल त्या पत्त्यामध्ये काही बदल करावयाचा असल्यास तो करावा अथवा तो तसाच सेव्ह करून नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.

कॅटेगरी व रिझर्वेशन च्या माहितीमध्ये अगोदरच दिलेली माहिती आपल्याला दिसून येते त्यामध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास ती करून सेव आणि नेक्स्ट बटन दाबावे.

आता अकॅडमिक कॉलिफिकेशन डिटेल्स टॅब ओपन होईल त्यामध्ये ड्रॉप डाऊन लिस्ट मधून आपले दहावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्रावरून संपूर्ण माहिती भरून गुणपत्रकाचा व प्रमाणपत्राचा फोटो जो पाचशे केबी पर्यंत असेल तो अपलोड करून माहिती सेव करावी.

वरील प्रमाणे बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन अशी एक एक करून माहिती भरून त्या त्या क्वालिफिकेशनचे प्रमाणपत्र व गुणपत्रक अपलोड करावे.

सर्व अकॅडमी कॉलिफिकेशन एक एक करून ॲड केल्यानंतर सेव व नेक्स्ट बटन दाबल्यानंतर आपल्याला व्यावसायिक पात्रते संबंधी आपण धारण केलेल्या डिप्लोमा डिग्री अथवा पदव्युत्तर पदवी ची माहिती अकॅडमिक कॉलिफिकेशन प्रमाणेच भरून गुणपत्रक व प्रमाणपत्र अपलोड करून सेव व नेक्स्ट बटन वर क्लिक करावे लागेल. हसल्यास इतर शैक्षणिक पात्रतेची माहिती व प्रमाणपत्र देखील आपण अपलोड करू शकता .


त्यानंतर State TET पात्रता आपण धारण करीत आहात की नाही असल्यास हो बटन वर क्लिक करून त्यासंबंधी संपूर्ण माहिती भरून सेव व नेक्स्ट बटन वर क्लिक करावे नसल्यास नो बटन वर क्लिक करून नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.

त्यानंतर Central TET (CTET) शिक्षक अभियोग्यता परीक्षा आपण धारण करीत असल्यास हो नसल्यास नाही बटन वर क्लिक करावे.

असल्यास संपूर्ण माहिती भरून सेव व नेक्स्ट बटनवर क्लिक करावे.


आपल्याला आतापर्यंत भरलेली संपूर्ण माहिती एका विंडोमध्ये दिसून येईल ती संपूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी त्यामध्ये बदल करायचे असल्यास मागे जाऊन योग्य तो बदल करावा जर माहिती अचूक असेल तर खाली दिलेल्या नियम व अटी मान्य असल्याबाबतच्या बॉक्सवर टिक करून सबमिट बटन वर क्लिक करावे. सबमिट बटन क्लिक केल्यानंतर पुन्हा एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला सूचना येईल की जर आपण ओके केले तर यानंतर कोणत्याही माहितीत बदल करता येणार नाही जर माहिती अचूक असेल तर ओके बटन वरती करून तुम्हाला आलेला ओटीपी व त्याखालील कॅपच्या कोड सबमिट करून आपला संपूर्ण अर्ज सबमिट करावा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला भरलेला अर्ज पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येईल.


अधिक माहितीसाठी पुढील फ्लो चार्ट चा वापर करून आपल्या अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.