शिक्षकांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिलेले स्पष्टीकरणात्मक आदेश

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग अंतर्गत संचालनालय लेखा व कोषागार या कार्यालयाने  दीर्घ सुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे मार्गदर्शन मागविले होते त्यानुसार दीर्घ सुट्टी सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागात कडून पुढील प्रमाणे सूचना प्राप्त झाल्या आहेत.


दीर्घ सुटी विभागासाठी नियम ५४ खाली जमा होणारी अर्जित रजा व शासन निर्णय दिनांक ०६.१२.१९९६ अन्वये जमा होणारी अर्जित रजा या दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत. दीर्घ सुटी विभागातील कर्मचाऱ्याला सदर नियम व शासन निर्णयान्वये अनुज्ञेय असलेल्या अर्जित रजेचे रोखीकरण करावे, असा कोणताही शासन निर्णय व नियम नाही. त्यामुळे दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय ठरत नाही. सबब, दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मध्ये अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेयतेबाबत तरतूद नाही. यास्तव सदर संवर्गांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अर्जित रजेचे रोखीकरण देय ठरणार नाही. संचालक, लेखा व कोषागारे कार्यालय, मुंबई व संबंधित विभागांनी सदर बाब आपल्या अधिनस्त कार्यालयांच्या निदर्शनास आणावी.


(अनिता लाड )


अवर सचिव, वित्त विभाग


वरील पत्राचा स्पष्ट अर्थ असा होतो की शिक्षक संवर्गातही कर्मचाऱ्यांना हार्दिक रजेचे रोखीकरण लागू नाही त्यामुळे रजा साठवून कोणताही फायदा नाही.







वरील दोन्ही परिपत्रके पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

3 Comments

  1. सर नमस्कार, मला मार्गदर्शन करावे ही विनंती सर आमच्या शाळेच्या शिक्षिका यांना पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती मिळाली परंतु त्यांनी नाकारली नंतर त्यांना मुख्याध्यापक पदाची पदोन्नती मिळाली ती ही नाकारली मात्र निवड श्रेणी वर दावा केला.मला मात्र निवड श्रेणी २०% नियमांमुळे मिळाली नाही मी वयाने त्यांच्या पेक्षा २ वर्षाने मोठा आहे.मी आर्यांच्या आगोदर सेवा निवृत्त होणार आहे.मला मात्र निवड श्रेणी मिळणार नाही कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.