प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 2 मार्च 2015 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
आर.टी.ई. अॅक्ट २००९ मधील प्रकरण चार मध्ये कलम २७ नुसार शिक्षकांना जनगणने कामी, नैसर्गीक आपत्तीसाठी, तसेच निवडणुक कामी (विधीमंडळ व संसद) वरील कामे वगळता इतर कुठलेही कामे देऊ नये असे स्पष्ट नमुद केलेले आहे. त्यास अनुसरून संदर्भ क्रं. २ मधील शासन निर्णय क्र. पिआरई २०१०/प्रक्र. २२५/प्राशि-१ दि. १८ जून २०१० अन्वये विद्यार्थी शिक्षक प्रमाण प्रयोजनासाठी शाळेत पदस्थापित केलेला कोणताही शिक्षक इतर कोणत्याही शाळेत / कार्यालयात काम करणार नाही. व त्यास दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे किंवा स्थानिक प्राधिकरण, राज्य विधान सभा व लोकसभा निवडणुकांच्या कर्तव्याखेरीज इतर कोणतेही शिक्षणेतर काम देण्यात येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे.
तथापि काही जिल्हयांमध्ये शिक्षकांना अन्य अशैक्षणिक कामे दिली जात असल्याची बाब निदर्शनात आलेली आहे तरी आर. टी. ई. अॅक्ट २००९ मधिल तरतुदी व उपरोक्त शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या सूचना विचारात घेऊन शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत. तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली असेल तर तात्काळ रद्द करावीत. अशैक्षणिक कामे करीत असलेल्या शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येऊ नयेत. काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांना शाळेत अध्यापनाचे काम देण्याएवजी स्वीय सहायक म्हणुन काम दिले जाते ही गंभीर बाब आहे. हा आर.टी.ई. २००९ च्या कायद्याचा भंग आहे याबाबत अशा शिक्षकांना देण्यात आलेली ही अशैक्षणिक कामे तात्काळ रद्द करावीत व शिक्षकांना मूळ शाळेतील अध्यापनाच्या कामासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे.
(महावीर माने)
शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments