वेतन निवृत्ती वेतन अपडेट - दरमहा नियमित वेतन व निवृत्ती वेतनाबाबतची माहिती विहित वेळेत सादर करणेबाबत ग्रामविकास विभागाचे आदेश

ग्रामविकास विभागाने दिनांक 12 जुलै 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना दरमहा नियमित वेतन व निवृत्तीवेतन बाबतची माहिती विहित वेळेत सादर करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


आपणांस कळविण्यात येते की, जिल्हा परिषदांकडुन दरमहा मागविण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्ती वेतनाबाबतची माहिती ( अनुदान मागणीपत्र) शासनास दर महिन्याला उशिराने प्राप्त होते. त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी/कर्मचारी यांचे नियमित वेतन व सेवानिवृत्ती वेतन वेळेत त्यांच्या खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी दुरध्वनी द्वारे/ निवेदनाद्वारे शासनाकडे येत आहेत.


तरी, जिल्हा परिषदांकडुन दरमहा मागविण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्ती वेतनाबाबतची माहिती ( अनुदान मागणीपत्र) शासनास दर महिन्याला २० तारखेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात यावी, असे निर्देश आपल्या स्तरावरुन जिल्हा परिषदांचे संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना देण्यात यावेत, अशी आपणांस विनंती आहे.


(रा.प्र. भोईर )


उप सचिव तथा सहसंचालक, महाराष्ट्र शासन.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadशैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.