छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन २०२३ २०२४ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता ९ वी इयत्ता १० वी व १२ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्याकडून अर्ज भरून घेऊन सादर करणेबाबत

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी इयत्ता १० वी व १२ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस अर्ज करू इच्छिणाऱ्या लक्षित गटातील पात्र इयत्ता ९ वी इयत्ता १० वी व १२ वी साठी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना, मुख्याध्यापक शिफारस पत्र व अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या सूचना, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर सूचना देण्यात येत आहेत. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सदर अर्जाची छाननी व पडताळणी बाबत आपण आवश्यक कार्यवाही करावी व गट शिक्षणाधिकारी यांना आपल्या स्तरावरून कळवावे.


१) इयत्ता ९ वी व १० व ११ वी मध्ये नियमित शिकत असलेल्या व छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्याथ्यांचे अर्ज तालुकास्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडे जमा करावेत. 

२) गट शिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर अर्जाची संख्या विचारात घेऊन पुरेशा तज्ज्ञ व्यक्तीद्वारा अर्जांची छाननी व पडताळणी करावी.


(३) गट शिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर अर्जाची छाननी व पडताळणी करण्यासाठी माध्यमिक स्तरावरील तज्ञ शिक्षक, अनुभवी मुख्याध्यापक यांची तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती करावी व त्यांना अनुषंगिक सर्व सूचना द्याव्यात. 

४) गट शिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर छाननी व पडताळणी केलेले व शिष्यवृत्तीस पात्र असलेले सर्व अर्ज दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करावेत. 

५) शिक्षणाधिकारी माध्यमिक आपल्या जिल्ह्याचे सर्व अर्ज एकत्रित करून प्रपत्र ख मध्ये जिल्ह्याची माहिती संकलित करावी.


६) माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचे इयत्ता ९ वी इयत्ता १० वी व १२ वी चे सर्व अर्ज दिनांक ०६ सप्टेंबर २०२३ पर्यंत मा. व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी, पुणे (महाराष्ट्र) ४११००४ या पत्त्यावर खास दूताकरवी समक्ष अगर स्पीड पोस्टाने सादर करावेत.


तालुकास्तरावर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्जाची छाननी व पडताळणी करताना पुढील सूचना गट शिक्षणाधिकारी यांनी विचारात घ्याव्यात. (७) NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या व इयत्ता ९ वीमध्ये शिकत असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र समजण्यात यावे.


८) इयत्ता १० वी मध्ये नियमित शिकत असणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी मध्ये ५५% गुणासह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.


९) इयत्ता ११ वी मध्ये शिकत असेलल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी मध्ये ६०% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. १०) National Merit Cum Means Scholarship (NMMS) परीक्षा उत्तीर्ण झालेले व केंद्र शासनाच्या मेरीट लिस्टमध्ये येऊन


शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस घेऊ नयेत.


(११) NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण केंद्रशासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा (खुला संवर्ग OPEN). कुणबी,


कुणबी मराठा व मराठा - कुणबी (OBC संवर्ग) या चार लक्षित गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्र्यांचे अर्ज सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीस स्वीकारावेत.


१२) विद्याथ्र्यांची ऑनलाईन माहिती खाली दिलेल्या लिंकवर अचूक भरावी.


A) इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी https://forms.gl/voaZntddyiBxCq8 ही लिंक आहे.


B) इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी https://forms.tle/bxaskhZFqVHAYqGZ ही लिंक आहे. 

C) इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी https://forms.gle/hoTrPoEZEZwAUHnde ही लिंक आहे.

लिंकवरील माहिती इंग्रजी भाषेत भरणे आवश्यक आहे.


१३) महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच सारथी शिष्यवृत्ती योजना आहे. 

(१४) खालील शाळेतील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठीही अपात्र आहेत. अशा विद्यार्थ्याचे या शिष्यवृत्तीस अर्ज स्वीकारु नयेत.


A) विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व जुनियर कॉलेज मधील विद्यार्थी.


B) केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.


C) जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.


D) शासकीय वसतीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी. E) सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.


१५) इयत्ता ९ वी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे (आई वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- (अक्षरी रुपये तीन लाख पन्नास हजार) पेक्षा कमी असावे. विद्याथ्यांनी तहसिलदाराच्या स्वाक्षरीत असलेला चालू आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा. दाखल्याची सत्य प्रत विद्यार्थ्याच्या अर्जासोबत जोडावी. केंद्र सरकारच्या F. No.16/2020-5S Government Of India Ministry Of Education Department Of School Education & Literacy Shastri Bhawan, New Delhi Dated the 11 March 2022 च्या पत्रान्वये विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ३,५०,०००/- (अक्षरी रुपये तीन लाख पन्नास हजार इतकी केली आहे.


१६) इयत्ता १० वी व ११ व मध्ये शिकत असलेलेया विद्यार्थ्यांनी सदर शिष्यवृत्ती साठी २०२३ या सालातील १,५०,०००/- (अक्षरी रुपये एक लाख पन्नास हजार) पेक्षा कमी असलेला तहसिलदारांच्या स्वाक्षरीतील उत्पन्नाचा दाखला सादर करावा.


(१७) छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्जासोबत जोडलेल्या खालील क्रमाने कागदपत्रांची छाननी व पडताळणी करावी.


(A) विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज. इयत्ता ९ वी इयत्ता १० वी व १२ वी साठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.


B) मुख्याध्यापकांचे / प्राचार्याांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र. (प्रपत्र क ) C) विद्यार्थ्याच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील सन २०२३ २४ या सालातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत D) विद्यार्थ्याच्या आधार कार्डची सत्यप्रत.


E) विद्यार्थ्याचे स्वतःचे नावे बँक खाते असलेल्या पासबुकाच्या पहिल्या पानाची सत्यप्रत (नाव, खाते क्रमांक IFSC कोडसह नमूद असणे आवश्यक आहे.) F) NMMS शिष्यवृत्ती परीक्षेबाबत पुढील अटी आहेत. त्यांचे पालन होणे आवश्यक आहे. तरच विद्यार्थ्यास सारथी शिष्यवृत्ती योजना लागू राहील. भारत सरकारच्या दिनांक ११ मार्च २०२२ च्या परिपत्रकामध्ये NMMS शिष्यवृत्तीसाठी मुद्दा क्र. २ नुसार


अर्हता निश्चित केली आहे ती पुढीलप्रमाणे-

The renewal criteria has been revised from the existing pattern of getting 55% marks in Class- IX & XI and 60% in Class- X to the new pattern of getting minimum of 60 & marks in Class X only for continuation of scholarship (relaxable by 50% for SC/ST candidates) in next higher Classes while getting clear promotion from class IX to class X and from class XII in the first attempt. 

G) इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ९वी च्या वार्षिक परीक्षा ५५% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुण पत्रिकेची सत्यप्रत जोडावी. 

H) इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी च्या वार्षिक परीक्षेत ६०% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुण पत्रिकेची सत्यप्रत जोडावी.


1) NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक / निकालपत्रक 3) अन्य अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याची आवश्यकता नाही.


(१८) गट शिक्षणाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्ज छाननी व पडताळणी करणान्या तपासणी अधिकारी यांनी अर्जाची तपासणी झाल्यावर अर्जावर दिलेल्या रकान्यामध्ये नाव व स्वक्षरी करावी.


१९) काही एकत्रित कुटुंबातील विद्याथ्र्यांचा उत्पन्नाचा दाखला हा आजोबा, काका, आजी, काकी व अन्य नातेवाईकांच्या नावाचा असतो. सदर दाखल्यावर संबंधित विद्यार्थ्याच्या नावाचा व नात्याचा उल्लेख असावा. केवळ अशा दाखल्या सोबत विद्याथ्र्यांनी एकत्रित कुटुंबातील शिधापत्रिका (रेशन कार्ड) सत्यप्रत अर्जासोबत जोडलेली असावी व इतर विद्याथ्र्यांनी शिधापत्रिका सत्यप्रत जोडण्याची आवश्यकता नाही.


(२०) अपूर्ण भरलेला अर्ज. चुकीची माहिती भरलेला अर्ज, अपूर्ण कागदपत्रे असलेला अर्ज, विहित मुदतीत सादर न केलेले अन्य व्यक्तीचे बँक खाते पासबुक सत्यप्रत असल्यास सदर अर्जाचा स्वीकार करू नये.


२१) अपात्र विद्याथ्यांचे सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवून घेणे, उत्पन्न मर्यादाचे उल्लंघन होणे अन्य संवर्गाचे अर्ज दाखल करून शिष्यवृत्ती मिळविणे बाबत संबंधित विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचेवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करणेत येईल. यापूर्वी अशी शिष्यवृत्ती प्राप्त केली असल्यास परत करावी. याबाबत संबंधितांना अवगत करावे, २२) गट शिक्षणाधिकारी यांना तालुकास्तरावर अजांची छाननी व पडताळणी करताना काही शंका अडचणी असल्यास ०२०- २५५९२५०७ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन कामाच्या दिवशी विहित शासकीय कामकाजाच्या वेळेत संपर्क करावा.


२३) गट शिक्षणाधिकारी यांनी अर्ज छाननी व पडताळणीचे कामकाज विहित वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.. २४) उपरोक्त नमूद केलेल्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक मुख्यालय सारथी पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत.


उपरोक्त सूचनांचे पालन करून छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्ज छाननी व पडताळणीचे कामकाज आपण आपला सक्रिय सहभाग दिल्यास समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक साह्य करण्यास सारथी संस्थेस सुलभ होईल.श्री. अशोक काकडे (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी), पुणे


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


सारथी शिष्यवृत्ती अर्ज पीडीएफ डाउनलोड.

वर्ग नववा

Download


वर्ग दहावा

Download


वर्ग अकरावा

Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.