मुदतवाढ - तलाठी भरती 2023 अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ.

 राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने आज दिनांक 17 जुलै 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार.


सरळसेवा भरती 2023


तलाठी संवर्ग अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत


महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि. 26/06/2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमुद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क भरण्याकामी दिनांक 17/07/2023 रोजी 23.55 वा. पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तथापि प्रशासकीय कारणास्तव तलाठी भरतीकामी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क जमा करण्याकामी पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.


अर्ज सादर करण्याचा कालावधी


दि. 26/06/2023 रोजी पासून

दि. 18/07/2023 रोजी रात्री 23.55 वा. पर्यंत 


ऑनलाईन पद्धतीने विहीत शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

 दि. 20/07/2023 रोजी रात्री 23.55 वा. पर्यंत


तलाठी भरतीकामी वरीलप्रमाणे दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही..


(आनंद रायते ) भा.प्र.से. अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, पुणे



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏 



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.