राज्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळाच्या शाळांना इ. ५ वी व इ. ८ वी चे वर्ग जोडण्याबाबत आदेश

 राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळांच्या शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबतचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. सदर प्रकरणी, खालील मुद्द्यांची माहिती शासनास आजच सादर करावी.


१. सद्यस्थितीत राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळाच्या इ. १ ली ते इ. ४ थी, इ. १ ली ते इ. ७ वी, इ. ५ वी ते इ. ७ वी च्या किती शाळांना इ. ५ वी / इ. ८ वी चा वर्ग जोडावयाची कार्यवाही अद्यापपर्यंत प्रलंबीत आहे.


२. तसेच राज्यातील किती जिल्हा परिषद शाळा संबंधीत नगरपालिका/ महानगरपालिका/ कटकमंडळे यांच्याकडे स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत, याबाबतचा सद्यस्थितीदर्शक अहवाल.


सहपत्र : संदर्भाधीन प्रस्तावांच्या प्रती


(कविता तोंडे) कार्यासन अधिकारी


शिक्षण आयुक्तालयाने यावर दिलेले उत्तर.


महोदय,


बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा इक्क अधिनियम २००९ मधील तरतुदी विचारात घेऊन दि. १३/०२/२०१३ च्या शासन निर्णयान्वये, शाळांची प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशी संरचना / स्तर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच अधिनियमातील तरतुदी विचारात घेता, शासन निर्णय दि. २८/०८/२०१५ नुसार नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे याबाबत शाळांमध्ये संरचनात्मक बदल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार इ. १ ली ते इ.५ वी, इ. ६ वी ते इ. ८वी इ.वी ते १०वी असे गट करण्यात आलेले आहेत.


सद्यस्थितीत राज्यातील माध्यमिक शाळा या (अ) इ. ५ वी ते १० वी. (ब) इ. ५ वी ते इ.१२ वी. (क) इ.८ वी ते इ.१० वी (ड) इ. ८ वी ते १२ वी या गटाच्या / संरचनेच्या आहेत. तथापि, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार राज्यात नवीन शाळांना परवानगी देताना इ.१ ते इ. ५ वी, इ. ६ वी ते इ.८ वी व इ.९ वी ते इ.१० वी हे गट विचारात घेऊन परवानगी दिली जाते. माध्यमिक शाळा म्हणून परवानगी देतांना आरटीई २००९ लागू होण्यापूर्वी इ. ८ वी पासून देण्यात येत होती. तथापि, आरटीई २००९ तरतुदी विचारात घेऊन इ. १ वी पासून परवानगी देण्यात येत आहे.


दि. २ जुलै, २०१३ च्या शासन निर्णयान्वये इ. १ ली ते ४ थी च्या शाळांना इ. ५ वी चा वर्ग व इ.१ ली ते ७ वी च्या शाळांना इ. ८ वी चा वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन निर्णय दि.२४/३/२०१५ व दि. २८/०८/२०१५ च्या तरतुदीनुसार प्राथमिक शाळेच्या परिसरात अनुक्रमे ५ वी व इ. ८ वी वर्ग नसल्यास तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आयुक्त महानगरपालिका, मुख्याधिकारी नगरपरिषद/ नगरपालिका यांच्या शिफारशीने प्राथमिक शाळेत दिलेली इ. ५वी व इ. ८ वी वर्ग सुरु करण्यास शासनाने वेळोवेळी परवानगी दिलेली आहे. तसेच दि. १९/०९/२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये इ. ५ वी चा वर्ग व उच्च प्राथमिक शाळेस इ. ८ वी चा वर्ग जोडण्यासंदर्भात स्पष्टीकरण/ सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नविन शैक्षणिक धोरण २०२० व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतुदीप्रमाणे राज्यातील शाळांची संरचना ही इ. १ ली ते इ. ५ वी, इ. १ ली ते इ. ८ वी, इ. १ ली ते इ. १० वी, इ. १ ली ते इ. १२ वी किंवा यापैकी एक उदा. इ. १ ली ते ५ वी अशी संरचना राज्यातील शाळांची असणे आवश्यक आहे. परंतू स्थानिक स्वराज्य संस्थातील शाळांमध्ये यापुर्वीच्या धोरणानुसार इ. १ ली ते इ. ४ दो किंवा इ. १ ली ते ७ वी या प्रमाणे संरचना करण्यात आलेली आहे. उपरोक्त नमूद प्रमाणे न.पा./म.न.पा./कटक मंडळाच्या इ. ५. वी, इ. ८ वी चे वर्ग जोडण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून नगरपालिका व कटकमंडळांसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तर महानगरपालिकांसाठी, मनपा आयुक्त यांना घोषित करणे योग्य राहील.


प्राथमिक शिक्षकाची मंजूर पदे जिल्हा निहाय निश्चित करण्यात आलेली आहेत. राज्यात नपा/कटक मंडळ/मनपा मध्ये एकूण शिक्षक कर्मचारी संख्या २५६२३ तर एकूण शिक्षकेतर कर्मचारी संख्या ५२५ आहे. सोबत मंजूर पायाभूत पदांचा तपशील जोडला आहे. मंजूर पदांच्या मर्यादिमध्ये इ. ५ वी, इ. ८ वी चे वर्ग जोडल्यामूळे एकूण नपा/कटक मंडळे / मनपा अंतर्गत नव्याने निर्माण होणारी पदे जिल्हा निहाय निश्चित करण्यात आलेल्या पदांच्या मर्यादित आवश्यकतेनुसार वापरण्याचे अधिकार संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मनपा आयुक्तांना देणे उचित होईल.


इ. ५ वी व ८ वी चे वर्ग जोडत असताना एकाच वाडामध्ये एकाच व्यवस्थापनाच्या २ किंवा अधिक शाळा असल्यास अशा शाळांचे एकत्रीकरण करणे योग्य राहील. एकाच वार्डात इ. १ ते ४ थी व दुसरीकडे इ. १ ली ते ७ वी अशा शाळा असल्यास, अशा ठिकाणी नगरपालिका / कटक मंडळ क्षेत्रात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्तानी बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतुदी लक्षात घेता अशा शाळांचे एकत्रीकरण करावे किंवा विद्यार्थी संख्या व भौतीक सुविधा यांचा विचार करून इ. १ ली ते ५ वी साठी एक शाळा व इ. ६ वी ते ८ वी साठी दुसरी शाळा करता येईल. एकाच वार्डामध्ये २ माध्यमांच्या वेगवेगळ्या शाळा असण्याची शक्यता आहे. अशा शाळाबाबत शाळांचे एकत्रीकरण करताना इ. १ ली ते ५ वी व इ. ६ वी ते ८ वी अशी संरचना करण्याच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता पडताळून नपा/मनपा/कटक मंडळ प्रशासनाने पुढील आवश्यक कार्यवाही करणे योग्य राहील. उपरोक्त प्रमाणे अभ्यास करून इ. ५ वी व ८ वी चे वर्ग जोडनेकामी व नपा / मनपा/ कटक मंडळ व्यवस्थापनाच्या शाळांचे एकत्रीकरण करण्यासाठी सारासार विचार करून अंमलबाजवणी करणेकामी नगरपालिका व कमळासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तर महानगरपालिकसाठी मनपा आयुक्त यांना प्राधिकृत करणे योग्य ठरेल.
वरील सर्व परिपत्रके पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadशैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.