पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती परंतु वेतन मात्र तेच - ग्रामविकास विभागाचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी सर्व विभागीय आयुक्त व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेल्या स्पष्टीकरणानुसार पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकातून पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळाल्यानंतर एक वेतन वाढ देऊन वेतन निश्चिती करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


जे शिक्षक / मुख्याध्यापक वरिष्ठ किंवा निवडश्रेणी वेतन घेत असून ज्यांची केंद्र प्रमुख या पदावर नियुक्ती झाली आहे, त्यांची केंद्र प्रमुख पदावरील वेतन निश्चिती होणार नाही, त्यांना शिक्षक/ मुख्याध्यापक पदावर अनुज्ञेय असलेले वेतन अनुज्ञेय राहील, तसे न केल्यास शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त व ग्राम विकास विभागाच्या अधिनस्त प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातून केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती घेतलेल्यांच्या वेतनात तफावत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकातून पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळालेल्या, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची वेतन निश्चिती करताना वेतनवाढ देता येणार नाही.

सदर पत्र वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५०७/२२/सेवा-३, दिनांक /१२/२०२२ अन्वये दिलेल्या निर्देशास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏 

Post a Comment

1 Comments

  1. सर.. महीला व बालकल्याण विभाग चा पर्यवेक्षिका पदोन्नती सरळ सेवा भरती चा नवीन GR असल्यास पाठवा

    ReplyDelete