जिल्हाअंतर्गत बदली 2022 - मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यमुक्तीचे आदेश.

 जिल्हाअंतर्गत बदली 2022

दि.04/05/2023


प्रति,

गटशिक्षणाधिकारी सर्व


दि.04/05/2023 च्या  मार्गदर्शन सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा एकत्रित आदेश पाठवित आहोत.

 सदर आदेश आपले गटाकडील जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावा व  याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास त्वरित सादर करावा.तसेच दिलेल्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळल्या जातील याबाबत आपले स्तरावरून पुढील कार्यवाही करावी.


काही महत्वाच्या सूचना


१.या कार्यालयाकडून पाठविलेल्या बदली आदेशातील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

२. सर्व शिक्षकांचे एकत्रित आदेश निर्गमित केलेले आहेत.यामध्ये 

Cadre 1        =  241

Cadre 2        = 105 पैकी104

Entitled         = 299

Eligible          = 867 

Eligible 2       = 6

Difficult Aria =  159


एकूण 1677 बदली झालेल्या शिक्षकांपैकी पैकी 1676 शिक्षकांचा  एकत्रित आदेश पाठविण्यात आला आहे. प्रत्येक शिक्षकांचा स्वतंत्र आदेश या कार्यालयाकडून दिले जाणार नाहीत.संकलित आदेशातील पहिले पान, शेवटचे पान व आपले नाव ज्या पेज वर आहे त्या पानाची प्रिंट काढावी.

३. बदली झालेल्या सर्व शिक्षकांनी आपल्या लॉग इन वर उपलब्ध करून दिलेला डिजिटल स्वाक्षरी असलेला संगणकीय आदेश या आदेशासोबत जोडणे बंधनकारक असेल.या कार्यालयाकडील आदेश व संगणकीय आदेश  कार्यमुक्त व रुजू होताना सादर करावा.

४. आदेश डाउनलोड करण्यासाठी सर्व शिक्षकांना या कार्यालयाकडून कळविणेत आलेले होते तसेच आदेश डाउनलोड करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला होता.

५. बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करताना येणे-देणे नसलेबाबतचा दाखला देण्यात संबधित गटशिक्षणाधिकारी यांनी यावा.

६. दिलेल्या सूचनेनुसार कार्यमुक्त व रुजू  प्रक्रिया  पार पडल्यानंतर  दि.20/05/2023 रोजी सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या तालुक्याचा कार्यमुक्त व रुजू झालेल्या शिक्षकांचा संकलित अहवाल या कार्यालयास सादर करावा.

७. दिलेल्या सूचनेनुसार कार्यमुक्त व रुजू प्रक्रिया  पार पडताच सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या तालुक्याचा रिक्त पदांचा अहवाल  यापूर्वी दिलेल्या नमुन्यात 20 मे पर्यंत सादर करावा. सदर अहवाल मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावयाचा असल्याने दि.20/05/2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अहवाल सादर करावा.


बदली नियंत्रण कक्ष

जिल्हा परिषद रत्नागिरी.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.