शैक्षणिक सत्र 2023-24 मधील नियोजनासाठी सन 2023-24 मधील सुट्ट्यांची यादी

 बुलढाणा जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शैक्षणिक सत्र 2023-24 मधील नियोजनासाठी दिनांक 18 मे 2023 रोजी 2023-24 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.


बुलडाणा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शैक्षणिक सत्र २०२३-२४ मधील सुट्ट्यांबाबत.


१. उन्हाळी सुटी २ मे २०२३ ते २९ जून २०२३ अशी राहील.

२. प्रथम सत्र दिनांक ३० जून २०२३ ते १०/११/२०२३ असे राहील. 

३. दिपावली सुटी दिनांक ११/११/२०२३ ते २५/११/२०२३ अशी राहील.

४. द्वितीय सत्र दिनांक २८/११/२०२३ ते ०४/०५/२०२४ पर्यंत राहील.


(दि. २६ व २७ नोव्हेंबरला सुट्टी असल्याकारणाने सत्राची सुरुवात दि. २८ नोव्हेंबर २०२३ पासून होईल.) 

५. मुख्याध्यापकाच्या अधिकारातील चार सुट्या मुख्याध्यापकांनी वर्षाचे सुरुवातीला निश्चित करुन शिक्षणाधिकारी (मध्य.) यांना अवगत कराव्यात. मा. जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी जाहीर केलेल्या सुट्या तसेच शासन स्तरावरून जाहीर झालेल्या सर्व सार्वजनिक सुट्या त्याच दिवशी शाळांनी घेणे बंधनकारक आहे. विवरण तक्ता रकाना क्रं. ६ मध्ये मुख्याध्यापकाच्या अधिकारातील ३+१ अशा एकूण ४ (चार) सुट्या संभाव्य म्हणून दर्शविलेल्या आहेत. स्थानिक गरजेनुसार मुख्याध्यापकांनी त्यात बदल करावा. सदर बदल शिक्षाणाधिकारी (माध्यमिक) यांना शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीस लेखी कळवावा. 

६. प्रयोगशाळा सहायक व प्रयोगशाळा परिचर सोडून इतर शिक्षकेतर कर्मचारी यांना दिर्घसुटी अनुज्ञेय नाही. मात्र दिर्घसुटीच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुट्या असतील त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असतील. ७. सार्वजनिक सुट्यांची व मा. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या सुट्यांची तसेच रविवारी येणाऱ्या सुट्यांची यादी सोबत जोडलेली आहे. १ जानेवारी २०२४ ते ४ मे २०२४ मधील सुटया 'इंटरनेटवरून' घेतलेल्या आहेत. त्या सुटयासंबंधी २०२४ मधील शासकिय परिपत्रकावरून खात्री करुन घ्यावी व त्यानुसार बदल करावा.

 ८. शैक्षणिक सत्र २०२३ २४ मधील एकूण कामाचे दिवस व सुट्यासंबधी विवरण तक्ता सोबत दिला आहे.


९. शैक्षणिक सत्र २०२३ २४ मध्ये माध्यमिकसाठी एकूण कामाचे दिवस २३० राहतील. १०. शाळा सुरु होण्यापूर्वी विदयार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकाचे वितरण पूर्ण होईल याची खात्री करावी.


११. काही बदल झाल्यास शुद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येईल.


शासकीय सुट्या शैक्षणिक वर्ष 2023 24 यादी
वरील संपूर्ण शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.