बदली अपडेट - सन 2022 मध्ये बदली झालेल्या Current Working Area Joining Date तपासणी करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश

 ऑनलाईन बदली प्रक्रिया सन 2022 अंतर्गत अवघड क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांनी आक्षेप घेतलेल्या शिक्षकांची आपल्या स्तरावर तपासणी करुन तात्काळ माहिती सादर करण्याबाबत  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या निर्देशावरून शिक्षणाधिकारी प्राथमिक चंद्रपूर यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


सन 2022 अंतर्गत ऑनलाईन टप्पा क्रमांक -6 मध्ये अवघड क्षेत्रामध्ये बदली झालेल्या शिक्षकांवर अन्याय होऊ नये याबाबत सन 1987 ते 1999 पर्यंत कार्यरत शिक्षकांनी ऑनलाईन पोर्टलवर आवेदन केलेल्या शिक्षक कर्मचान्याची [Current Working Area Joining Date ची तपासणी करण्याबाबत या कार्यालयास सुचना प्राप्त झालेली आहे. तसेच अवघड क्षेत्रामध्ये बदली झालेल्या शिक्षक संवर्गाने घेतलेल्या आक्षेपावरुन संदर्भीय 2 व 3 अन्वये एकुण 400 + 219 आक्षेपीत शिक्षकांची Current Working Area Joining Date ची तपासणी या पुर्वीच कार्यालयातर्फे करण्यात आलेली आहे. परंतू संदर्भ क्र. 1 व विविध संघटणाने घेतलेल्या आक्षेपावरुन सन 2022 मध्ये अवघड क्षेत्रामध्ये बदली झालेल्या बदलीपात्र शिक्षकांची व तक्रारकर्ता शिक्षकांनी दिलेल्या यादीतील कर्मचाऱ्याची Current Working Area Joining Date ची तपासणी केली परंतू इतरही कर्मचाऱ्यांची Current Working Area Joining Date तपासणे आवश्यक असल्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे उर्वरीत शिक्षकांची तपासणी करणे आवश्यक आहे. करीता संबंधीत कर्मचान्यांची या सन 1987 ते 1999 पर्यंत तपासणी केली असता एकूण 2865 कर्मचारी सन 2021-22 च्या बदलीकर्ता ऑनलाईन आवेदन सादर केलेले आहे. सदर आवेदनातून सन 1987 ते 1999 पर्यंत असणारे एकुण 2865 शिक्षकांची यादीतील शिक्षकांपैकी यापुर्वी बदली झालेले शिक्षक व 53 वर्ष पुर्ण असणारे शिक्षक संवर्ग वगळता एकूण 1026 शिक्षकांची Current Working Area Joining Date ची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे. 

1. सोबत जोडलेल्या विहीत प्रपत्रात शिक्षक निहाय माहिती प्रत्यक्ष तपासणी दि. 29 व 30/05/2023 रोजी आपल्या स्तरावरून नियोजनबध्द करावी तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांची Current Working Area Joining Date अचुक माहिती आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अभिलेखावरुन तपासावी.


2. अवघड क्षेत्राची गणना सन 2018-19 रोजी घोषित केलेल्या गावापैकीच असावी. याची खात्री आपल्या स्तरावरुन करण्यात यावी.


3. सोबत पाठविण्यात आलेल्या शिक्षकांची माहिती विहीत प्रपत्रात दि. 31.05.2023 ला दु 3.00 वाजेपर्यंत खास दुतामार्फत या कार्यालयास पोहचणार याची व्यवस्था आपल्या स्तरावरून करण्यात यावी.


4. सदर माहीती तपासतांना काही अडचन निर्माण झाल्यास वरिष्ठ कार्यालयातील भ्रम्हणध्वनी क्र. 9273960111, 9096048596, 9021609035 व 9158553753 वर संपर्क साधावा.




वरील शिक्षणाधिकारी यांचे संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.