संप काळातील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार नाही - मुख्यमंत्री

संप काळातील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार नाही - मुख्यमंत्री.


राज्य सरकारी व निमसरकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांनी दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी सरकारी कर्मचारी शिक्षक बेमुदत संप वेतन कपात करू नका असे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांचे आदेश मथळ्याखाली प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केले आहे.


तीन एप्रिल 2023 रोजी समन्वय समिती व सहकारी यांनी शासनाच्या सह्याद्री अतिगृहात माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संपकऱ्यांची वेतन कपात होऊ नये याविषयी प्रस्तावात्मक निवेदन सादर केले मुख्य सचिवांसह संबंधित सर्व सचिवांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी शिक्षकांची वेतन कपात करू नका असे स्पष्ट आदेश यावेळी दिले आहेत.

दिनांक 14 मार्च ते दिनांक 20 मार्च कसा एकूण सात दिवसांचा संप कालावधी होता सदर कालावधी असाधारण रजा म्हणून गृहीत धरावा असा आदेश दिनांक 28 मार्च रोजी शासनाने पारित केला होता याविषयी दिनांक 20 मार्च रोजी निर्णायक चर्चा झाली होती या चर्चेत सदर संप कालावधी ध्येय रजा देऊन नियमित करावा असे निसंधिग्ध आश्वासन माननीय मुख्यमंत्री यांनी त्यावेळी दिलेले असतानाही 28 मार्च चा विसंगत आदेश पारित झाला होता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षक प्रक्षुद्द झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील मोठ्या मनाने वेतन कपातील मज्जाव केला आहे.

जुनी पेन्शन सर्वांना लागू करा या मागणीबाबत शासन कर्मचारी शिक्षकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यास असेच सकारात्मक धोरण ठेवी अशी अपेक्षा आम्ही यावेळी व्यक्त करतो असे राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती ने सदर परिपत्रकात म्हटले आहे.





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.