सन २०२३-२४ करिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन प्रवेश कागदपत्र पडताळणी शिक्षण संचालनालय स्तरावरील अपडेट

महाराष्ट्र शासन

प्राथमिक शिक्षण संचालनालय,

डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे १.

वरील कार्यालयाने दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी पुढील प्रमाणे आरटीई 25% प्रवेश प्रक्रिये संदर्भात निर्देश दिले आहे.


 प्रकटन


सन २०२३-२४ करिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन प्रवेश. 





बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अन्वये दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाइन पध्दतीने राबविण्यात येते.


त्यानुसार, सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन सोडत बुधवार दिनांक ०५ एप्रिल २०२३ रोजी काढण्यात आली असून, ज्या बालकांची निवडयादीमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे, त्या बालकांच्या पालकांनी दिनांक १३ एप्रिल २०२३ ते दिनांक २५ एप्रिल २०२३ या कालावधीत पंचायत समिती / महानगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याबाबत या पूर्वी निर्देश देण्यात आले होते.


तथापि, सद्यस्थितीत आरटीई २५ टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी याबाबत पालकांने कोणतीही भिती / संभ्रम बाळगू नये, तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) व्दारे निवड झाली आहे, अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल.


शरद गोसावी

शिक्षणसंचालक (प्राथमिक), महाराष्ट्रराज्य, पुणे ०१.


वरील प्रमाणे जाहीर प्रकटनाद्वारे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पालकांना आश्वस्त केले आहे.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.