शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन संरचनेबाबत अधिसूचना आक्षेप व सूचनेसाठी 3 एप्रिल 2023 ही मुदत.
महाराष्ट्र शासनाचे राजपत्र निर्गमित करून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 3 मार्च 2023 रोजी अधिसूचना प्रकाशित केली आहे.
सदर अधिसूचनेत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू असलेल्या वेतनश्रेणी व आश्वासित प्रगती योजने संदर्भातील वेतनश्रेणी सदर अधिसूचनेत नमूद केल्या आहेत.
सदर अधिसूचना अंतिम करण्यासाठी शासनाने त्यावर सूचना व हरकती मागविल्या आहेत आणि सूचना व हरकती दिनांक 3 मार्च 2023 पर्यंत सदर अधिसूचनेवर प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई 400032 या पत्त्यावर सदर सूचना व आक्षेप पाठवायचे आहेत.
उपरोक्त राजपत्र शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई दि. ३ मार्च २०२३ चे नोटिफिकेशन असून यात schedule "C" प्रमाणे माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्याबाबत हरकती व सूचना मागितलेल्या आहेत. जर २ एप्रिल २०२३ पर्यंत कोणीच हरकती नोंदवल्या नाही तर ३ एप्रिल २३ पासुन सदर अधिसुचना अंमलात आणली जाईल, असे आदेश आहेत. तरी शालेय शिक्षण विभागाकडे हरकती नोंदवाव्यात, जेणे करुन शासनाला त्यावर विचार करावा लागेल.
वरील संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
वरील अधिसूचनेवर आक्षेप घेण्यासाठी नमुना अर्ज पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
2 Comments
पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी स्लॅब S15 द्यावी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक विस्तारअधिकारी पदावर पदोन्नती साठी प्रथम पदवीधर शिक्षकांना प्राधान्य दिले जावे. पदवीधर शिक्षक पदासाठी बी एड ची अट असावी
ReplyDeleteअशा प्रकारची सूचना प्रधान सचिव शालेय शिक्षण यांना दिनांक 3 मार्चपर्यंत पाठवा🙏
Delete