सातवा वेतन आयोग हप्ता अपडेट - आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता मिळणार नाही.
महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 13 मार्च 2023 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार सन 2022 23 या आर्थिक वर्षांमध्ये सातव्या वेतन आयोगातच्या तिसरा हप्त्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
या अगोदर या कार्यालयाकडील आदेशानुसार 2022 23 या आर्थिक वर्षात सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले होते.
परंतु आता दिनांक 13 मार्च 2023 रोजी च्या पत्रानुसार सन 2022 23 या आर्थिक वर्षांमध्ये लेखाशीर्ष निहाय शंभर टक्के तरतूद वितरित करण्यात आलेली असल्यामुळे उपलब्ध करून दिलेल्या निधीतून अथवा तरतुदी म्हणून सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करण्यात येऊ नये असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व व अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांना दिले आहेत.
त्यामुळे जर आपण मार्च एंडिंग मध्ये सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता आपल्याला मिळेल यानुसार आपल्या आर्थिक नियोजन केलेले असेल तर सदर नियोजनात बदल करावा लागेल.
कारण या आर्थिक वर्षात तरी निदान सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता आपल्याला मिळणार नाही.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments