बदली अपडेट - शिक्षक बदली प्रक्रिया संवर्ग 1 करीता महत्वाची सूचना.

अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याबाबत महत्त्वाचे मुद्दे.


शिक्षक बदली प्रक्रिया संवर्ग 1 करीता महत्वाची सूचना. 


शेवटच्या राऊंड करीता मेळघाटातील रिक्त पदे भरण्यासाठी जी यादी प्रसिद्ध झाली होती. त्या यादीमध्ये संवर्ग 1 व 2 संदर्भात महाराष्ट्र तील सर्व संघटनांनी  पुढाकार घेऊन संवर्ग 1 व 2 ला न्याय मिळवून दिला.  परंतु आता अमरावती जिल्यातील संवर्ग 1 मधील सर्व शिक्षकांनी (ज्यांनी संवर्ग 1 मध्ये बदली करून घेतली ते सोडून ) उरलेल्या संवर्ग 1 चे सर्व शिक्षकांनी उद्या दि.६/३/२३ पासून सुरू होणाऱ्या बदली पोर्टलवर नकार नोंदवावा. नाहीतर माझे नाव तर यादीमध्ये नाही मी कशाला नकार नोंदवू. असे करू नका.यापुढे या विषयावर  कोणत्याही प्रकारची दखल पोर्टल अथवा शिक्षणमंत्री घेणार नाही.


अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याबाबत ची प्रक्रिया दिनांक 28 फेब्रुवारी 2023 च्या ग्राम विकास विभागात कडील प्राप्त झालेल्या पत्रानुसार राबवली जाणार आहे.

प्रथमतः ज्या शिक्षकांची सलग सेवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असेल अशा सर्व शिक्षकांची यादी बनवली जाईल यामध्ये जे शिक्षक बदली पात्र आहेत परंतु अद्याप यांची बदली झालेली नाही अशा शिक्षकांचा सुद्धा समावेश असू शकतो.

ज्या शिक्षकांनी यापूर्वी बदलीतून सूट घेतलेली आहे अशा शिक्षकांचा व ज्या शिक्षकांची संवर्ग एक दोन तीन चार व टप्पा क्रमांक पाच मधून बदली झालेली आहे अशा शिक्षकांचा या यादीत समावेश असणार नाही.

2019 च्या सर्वसाधारण अवघड क्षेत्र यादीनुसार एखादी शाळा सर्वसाधारण क्षेत्रात असेल व 2022 च्या यादीनुसार तीच शाळा अवघड क्षेत्रातील असल्यास अशा शाळेतील शिक्षकांनी यादीत समावेश असणार नाही.

प्रसिद्ध केलेल्या यादीत जे शिक्षक संवर्ग एक मध्ये असतील ते होकार किंवा नकार देऊ शकतात त्यासाठी वेळापत्रकानुसार दिनांक 6 मार्च 2023 ते 8 मार्च 2023 यादरम्यान पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.


30 जून 2022 पर्यंतचे शिक्षकच संवर्ग एक मध्ये होकार अथवा नकार देण्यासाठी पात्र असते 30 जून 2022 नंतर एखादे शिक्षक संवर्ग एक साठी पात्र होत असल्यास अशा शिक्षकांना संवर्ग एक चा लाभ घेता येणार नाही.

होकार नकार दिल्यानंतर वेळापत्रकानुसार दिनांक 9 मार्च 2023 ते 11 मार्च 2023 दरम्यान जिल्हास्तरावर सर्व कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे त्यामुळे संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आढळल्यास असे अर्ज ऑनलाईन प्रणालीतून बात करण्यात येतील व अशा संबंधित शिक्षकांवर शिस्तभंग कार्यवाही होऊ शकते.

कागदपत्र पडताळणी नंतर अवैध अर्ज ऑनलाईन प्रणालीतून बाद करण्यात येतील व वैध अर्जातून बदलीतून सूट घेतलेल्या शिक्षकांना यादीतून वगळण्यात येईल त्यानंतर सिस्टीम द्वारे सेवाजेष्ठतेनुसार व वास्तव सेवा जेष्ठतेनुसार पात्र शिक्षकांची अंतिम यादी बनवून दिनांक 13 मार्च 2023 रोजी सदर यादी प्रसिद्ध केली जाईल.

दिनांक 13 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीतील पात्र शिक्षकांना वेळापत्रकानुसार दिनांक 14 मार्च 2023 ते 17 मार्च 2012 या अखेर अवघड क्षेत्रातील रिक्त जागांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

अत्यंत महत्त्वाचे.. 

दिनांक 13 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीतील पात्र शिक्षकांपैकी काही शिक्षकांनी प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा प्राधान्यक्रमात दिलेली शाळा उपलब्ध नसल्यास सिस्टीम मध्ये उपलब्ध असलेल्या जागेवर सॉफ्टवेअर मार्फत संबंधित शिक्षकाची बदली केली जाईल.

वारंवार विचारला जाणारा प्रश्न.. 

काही शिक्षकांच्या पोर्टलवर काही तारखा चुकीच्या नोंदवल्या गेल्या आहेत विशेषतः सध्याच्या क्षेत्रातील रुजू दिनांक ही दुरुस्त करता येईल काय? 

एखादी तारीख चुकीची झालेली आहे अशा शिक्षकांना यापूर्वी चार-पाच वेळा दुरुस्तीसाठी एक्सेल फाईल तालुका केंद्रस्तरावर पाठवली होती त्यावेळी तारखा चेक करून दुरुस्ती करणे अपेक्षित होते त्यानंतर पोर्टलवर माननीय शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे अपील करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती त्यावेळी दुरुस्त करून घेणे अपेक्षित होते त्यामुळे आता सद्यस्थितीत बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे कोणत्याही तारखा बदलण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.


महत्वाचे.. . 

वरील दिलेल्या सूचना मार्गदर्शन किंवा मांडलेले मुद्दे अंतिमच आहे असे समजू नये वरिष्ठ स्तरावरून नवीन सूचना प्राप्त झाल्यास बदल होऊ शकतो.


वरील दिलेल्या सूचना मार्गदर्शन हे ग्रामविकास विभागाचा दिनांक सात एप्रिल 2021 चा जिल्हाअंतर्गत बदली बाबतचा शासन निर्णय व ग्रामविकास विभागाकडून वेळोवेळी प्राप्त झालेली मार्गदर्शक सूचना पत्रे तसेच वेळोवेळी वरिष्ठ स्तरावरील मिळालेल्या सूचनांच्या आधारावर आहे. 

आपल्या मनात या टप्प्यातील बदली बाबत कोणतीही शंका असल्यास सर्वप्रथम ग्रामविकास विभागाचा जिल्हा अंतर्गत बदली बाबतचा दिनांक 7 एप्रिल 2021 चा शासन निर्णय 

व त्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

2 Comments

  1. Pradeep jadhav sir have a any cashless hospitaldfor teacher in Maharashtra

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.