बदली अपडेट - अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र शिक्षकांच्या यादी संदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय

 सन 2022 मधील बदली प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे.


बदली प्रक्रियेचा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे सदर अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अवघड क्षेत्रात बदली पात्र शिक्षकांचे जाहीर करण्यात आल्या होत्या.


परंतु सदर याद्यांमध्ये जे शिक्षक विशेष संवर्ग भाग एक मध्ये मोडतात अशा शिक्षकांची नावे देखील आलेली होती.


सदर शिक्षकांनी त्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता उच्च न्यायालयाने विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांनी स्वतः विनंती केली असेल तरच बदली करावी अन्यथा त्यांची इतरत्र बदली करू नये असे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.


विविध ठिकाणी कार्यरत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 50 सहाय्यक शिक्षकांनी हायकोर्ट याचिका दाखल केली होती राज्य सरकारने सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मध्ये आजार असलेल्या शिक्षकांना वैद्यकीय सूट दिली होती त्यामुळे अवघड भागात बदली करू शकणार नाही परंतु राज्य सरकारने ऑनलाईन पोर्टल द्वारे 22 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील 125 शिक्षकांची यादी जाहीर केली या यादीत याचिका करता 50 सहाय्यक शिक्षकांचा समावेश होता अवघड क्षेत्रात बदली होण्यास पात्र म्हणून 50 शिक्षकांचा यादीत समावेश करण्यात आला 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार स्पष्टपणे विशेष संवर्ग क्षेत्र भाग ही शिक्षकांना बदली देऊ नये तसेच बदलीस पात्र देखील ते नव्हते 50 विशेष शिक्षक संवर्ग भाग एक मध्ये येत असल्यामुळे त्यांच्या विनंतीवरून बदली देण्यात येईल असे शासन निर्णयात नमूद आहे. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल परंतु त्यांचे नाव बदली पात्र शिक्षकांची यादीत आले असल्यास त्यांनी स्वयंघोषित प्रमाणपत्र देण्याची गरज होती परंतु याचिका करता शिक्षकांना ऑनलाइन पोर्टलवर होकार किंवा नकार दर्शवण्यासाठी मुभा दिली नाही त्यामुळे याचिकाकर्ते शिक्षकांनी ही प्रक्रिया किंवा त्यांची नावे यादीतून वगळण्याकरता हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 


वरील न्यायालयाच्या आदेशामुळे ग्राम विकास विभागाने नवीन परिपत्रक निर्गमित करून सदर शिक्षकांना होकार अथवा नकार दर्शवण्यासाठी पोर्टल दिनांक सहा मार्च 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

व त्यानंतर पुन्हा याद्या प्रकाशित होऊन त्या यादीतीलच शिक्षकांना अवघड क्षेत्रात बदलीने नियुक्ती देण्यात येणार आहे.


त्या संदर्भातील बातम्या पुढील प्रमाणे वृत्तपत्रात छापून आलेल्या आहेत.





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

 



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.