प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे लेखापरीक्षण करणे बाबत शिक्षण संचालनालया चे परिपत्रक.
प्राथमिक शिक्षण संचालनालय मधील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या स्वतंत्र कक्षातून निर्गमित दिनांक 8 फेब्रुवारी 2023 च्या परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे लेखापरीक्षण करणे बाबत शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून विविध प्रकारचे अनुदान शाळांना वितरित करण्यात येत आहे. केंद्र शासनाने वितरित केलेला निधी लाभार्थ्यापर्यंत विहित कालमर्यादित पोहोचत असल्याची खातरजमा करणे, वितरित केलेले अनुदान कोणत्याही कारणासाठी शाळा स्तरावर प्रलंबित राहणार नाही हा उद्देश या लेखापरीक्षणामागे असून शाळा तालुका जिल्हास्तरावर योजनेकडून वितरित करण्यात आलेले अनुदान खर्च करण्यात आलेल्या बाबी व कालावधीच्या अनुषंगाने अंमलबजावणीसाठी अनुदानाच्या खर्चाचे लेखापरीक्षण करणे करिता शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर संस्थेमार्फत सन 2015-16 ते सन 2019 20 या पाच वर्षाच्या कालावधीत शाळा पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्याकडील शालेय पोषण आहार योजनेच्या अभिलेख यांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे.
लेखापरीक्षण पूर्ण करण्याकरिता विहित नमुन्यातील वेब फॉर्म लेखापरीक्षण नमुनापर पत्र मधील माहिती भरण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आलेल्या आहेत. शाळांनी सादर केलेली माहिती व शाळा कडील उपलब्ध असलेले अभिलेख यांची तपासणी करण्याकरता प्रत्यक्ष लेखापरीक्षण कार्यक्रम राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. जिल्ह्यामध्ये लेखापरीक्षण कार्यक्रम सुरळीतपणे राबविण्याकरिता खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहे.
1) लेखापरीक्षणाचे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर शिक्षण अधिकारी प्राथमिक व लेखाधिकारी शालेय पोषण आहार यांनी सर्व तालुक्यांना लेखी निर्देश देऊन तालुकास्तरावर लेखापरीक्षण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करावयाचे आहे.
2) लेखापरीक्षण नियोजनाकरिता श्री अक्षर आंबेकर यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.
3) शाळा पंचायत समिती व तालुका स्तरावरील सन 2015 16 ते सन 2019 20 या पाच वर्षाच्या कालावधीत सर्व अभिलेखके लेखापरीक्षणाकरिता उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश सर्व शाळांना लेखी स्वरूपात निर्गमित करण्यात यावे.
4) तालुकास्तरावर लेखा परीक्षण कार्यक्रम सुरू असताना ज्या शाळा अभिलेखे सादर करणार नाहीत अशा शाळांना जिल्हा परिषद अथवा प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथे उपस्थित राहून अभिलेखे सादर करावी लागतील याबाबत सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.
4) शाळांची लेखा परीक्षण करणे करता आवश्यक खर्च संचालनालय स्तरावरून अदा करण्यात येणार असल्याने क्षेत्रीय स्तरावर कोणत्याही स्वरूपाचा खर्च अथवा पैसे संबंधित संस्थेच्या प्रतिनिधीस अथवा इतर कोणत्याही व्यक्तीस देण्यात येऊ नये याबाबत स्पष्ट निर्देश शाळांना पोचतील याची दक्षता घ्यावी.
5) क्षेत्रीय स्तरावर कोणत्याही स्वरूपाची पैशाची देवाण-घेवाण होणार नाही याची काळजी तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी व अधीक्षक शालेय पोषण आहार यांनी घ्यावयाची आहे कोणत्याही तालुक्यांमध्ये असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितावर उचित कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेणेबाबत निर्देश देण्यात यावेत.
क्षेत्रीय स्तरावरून प्रत्यक्ष लेखापरीक्षण कार्यक्रम सुरू असताना शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी लेखा अधिकारी यांनी वेळोवेळी लेखापरीक्षण सुरू असणाऱ्या तालुक्यांना भेटी देऊन शाळांकडून लेखापरीक्षणाबाबत अभिप्राय घ्यावेत व त्याचा अहवाल व सद्यस्थितीबाबत शिक्षण संचालनालयाला सादर करावा.
क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष लेखापरीक्षण सुरू असताना गटशिक्षणाधिकारी यांनी वेळोवेळी लेखापरीक्षण स्थळास भेट देऊन सद्यस्थितीबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना अवगत करावे.
अधीक्षक शालेय पोषण आहार यांनी तालुका स्तरावर लेखापरीक्षण कार्यवाहीचे निरीक्षण करावयाचे आहे व स्वतः सदर ठिकाणी अधीक्षक शालेय पोषण आहार व डाटा एन्ट्री ऑपरेटर हे पूर्णवेळ उपस्थित राहतील.
मुंबई महानगरपालिका व इतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये लेखापरीक्षण कार्यवाही सुरू असताना शिक्षणाधिकारी अथवा प्रशासन अधिकारी संबंधित महानगरपालिका यांनी क्षेत्रीय अधिकारी भेटी पूर्ण वेळ उपलब्धतेबाबत योग्य ते नियोजन करायचे आहे.
जिल्ह्यामध्ये लेखापरीक्षणाचा उपक्रम सुरळीतपणे सुरू राहील याबाबत आवश्यक ते अधिकचे निर्देश आपले स्तरावरून निर्गमित करण्यात यावे.
वरील प्रमाणे प्रत्यक्ष लेखापरीक्षण कार्यक्रमाबाबत सूचना सदर परिपत्रकानुसार देण्यात आल्या आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments