बदली ब्रेकिंग - सन 2023-24 बदली प्रक्रिया 1 मार्च 2023 रोजी सुरू होणार आहे... कशा होणार?.

 पुढील वर्षीची सन 2023-24 बदली प्रक्रिया 1 मार्च 2023 रोजी सुरू होत आहे.



 त्यावेळी 2022-23 बदली प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनुभवांचा व सूचनांचा तसेच झालेल्या बदली प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास करून बदल कोणत्या बाबतीत करता येईल? याचा विचार केला जाणार आहे. 

17 फेब्रुवारी रोजी 2022-23 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण 20 फेब्रुवारी रोजी मिटींग घेऊन आलेल्या विनंती निवेदनावर चर्चा करून एकत्रितपणे सात /आठ मुद्द्याच्या अनुषंगाने शासन निर्णय व साॅफ्टवेअरमध्ये एकदाच बदल केला जाणार आहे.

संवर्ग तीन साठी चार-पाच आमदारांची निवेदने आहेत परंतु संवर्ग चार साठी मोठ्या प्रमाणावर म्हणजे 40/50 आमदारांची निवेदन आहेत. या लोकप्रतिनिधींची निवेदने तसेच कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे निवेदन, या सर्वांच्या निवेदनावर एकत्रितरीत्या विचार करून 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयामध्ये आवश्यक तो बदल करण्यात येणार आहे व या बदलानुसार पुढील वर्षीची 2023-2024 ची बदली प्रक्रिया 1 मार्च 2023 ते 31 मे 2023 अखेर पूर्ण करण्यात येणार आहे.


राज्य अध्यक्ष 

गजानन पांचाळ

स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. याचे काही लेखी पत्र वगैरे आहे का ? असल्यास पाठवजा please !

    ReplyDelete
    Replies
    1. आयुष प्रसाद बदली समिती अध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्र नाही

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.