बदली अपडेट - संवर्ग तीन बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी मुदत वाढ ग्रामविकास विभाग शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेद्वारे जिल्हाअंतर्गत बदल्यांचे धोरण दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वय विहित करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांची कार्यवाही दिनांक 20 डिसेंबर 2022 च्या वेळापत्रकानुसार सुरू असून बदली प्रणाली मधील टप्पा क्रमांक एक दोन व तीन मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे सद्यस्थितीत टप्पा क्रमांक चार मधील अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू आहे.
दिनांक 20 डिसेंबर २०२२ च्या वेळापत्रकानुसार सध्या टप्पा क्रमांक चार मधील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना ऑनलाइन बदली पोर्टलवर शाळांचा बदली प्राधान्यक्रम भरण्याची मुदत दिनांक 10 जानेवारी 2023 ते 14 जानेवारी 2023 अशी देण्यात आलेली होती.
तथापि दिनांक 20 डिसेंबर 2022 च्या वेळापत्रक मध्ये नमूद केल्यानुसार बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना ऑनलाईन बदली पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची मुदत दिनांक 10 जानेवारी 2023 ते 15 जानेवारी 2023 अशी करण्यात येत असून त्यांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदरची बाब सर्व शिक्षकांना तात्काळ निदर्शनास आणण्यात यावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments