नियमित पदावरील शिक्षकांची नामनिर्देशनाद्वारे अथवा स्पर्धात्मक निवड प्रक्रिया द्वारे किंवा उच्च वेतनश्रेणीत नियुक्ती झाल्यास पूर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत शासन निर्णय

 नियमित पदावरील शिक्षकांची नामनिर्देशनाद्वारे अथवा स्पर्धात्मक निवड प्रक्रिया द्वारे किंवा उच्च वेतनश्रेणीत नियुक्ती झाल्यास पूर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत शासन निर्णय. 


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची निवड पूर्वी केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारे तर खाजगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवा शक्ती अधिनियम 1977 मधील तरतुदीनुसार विहित प्रक्रिये द्वारे संबंधित खाजगी व्यवस्थापन मार्फत करण्यात येत होती तथापि शासन निर्णयातील तरतुदीनुसार सद्यस्थितीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे पवित्र या संगणकीय प्रणाली द्वारे भरण्यात येत आहे. 

कार्यरत नियमित शिक्षकांची उच्चहरता प्राप्त करून नामनिर्देशनाद्वारे किंवा स्पर्धात्मक निवड प्रक्रिये द्वारे निवड होऊ नये उच्च असमान पदावर नियुक्ती झाल्यास वेतनास संरक्षण नसल्याच्या शासन निर्णयातील अटीमुळे अशा शिक्षकास पूर्वी केलेल्या सेवेचा लाभ नवीन नियुक्ती च्या वेळी होत नसल्याने त्यास अशी नवीन नियुक्ती स्वीकारणे अहितकारी ठरते. त्यामुळे अशा नियमित कार्यरत शिक्षकांनी नामनिर्देशनाद्वारे किंवा स्पर्धात्मक निवड प्रक्रिये द्वारे निवड होऊन नवीन नियुक्ती स्वीकारल्यास त्याच्या वेतनात संरक्षण देण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधीकडून करण्यात येत होती. 

सदर मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 15 सप्टेंबर 2011 मधील अट किंवा शर्त क्रमांक तीन मध्ये सुधारणा करण्यात येऊन नियमित कार्यरत शिक्षकांची नियुक्ती नामनिर्देशनाद्वारे अथवा स्पर्धात्मक निवड प्रक्रिया द्वारे दुसऱ्या समान तसेच उच्च असमान पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकांच्या पूर्वीच्या पदावरील वेतनास संरक्षण देण्याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. 

नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे किंवा स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दुसऱ्या समान तसेच उच्च असमान पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकांच्या पूर्वीच्या वेदनास संरक्षण देतेवेळी खालील अटी व शर्ती लागू राहतील. 

स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शाळेतील पूर्वीची नियुक्ती ही विहित मार्गाने प्रक्रियेद्वारे झाली असावी. 

पूर्वीच्या नियुक्तीस वेळोवेळी वैयक्तिक मान्यता मिळालेली असावी तसेच वेतन अनुदान मिळत असावे. 

पूर्वीची नियुक्ती विहित मार्गाने प्रक्रियेद्वारे झालेली नसल्यास नियमित वेतन जमिनीमध्ये कार्यरत शिक्षकांची नव्याने नियुक्ती झाल्यास त्याच्या पूर्वीच्या वेतनास संरक्षण मिळणार नाही तथापि शासन निर्णय दिनांक 15 सप्टेंबर 2018 नुसार अशा शिक्षकास शिक्षण सेवक योजना लागू होणार नसल्याने त्याचे वेतन नव्याने नियुक्त पदास लागू वेतन सेनेच्या किमान टप्प्यावर निश्चित करण्यात येईल. 

पूर्वीची सेवा व नवीन नियुक्ती यामध्ये सेवा खंड असल्यास वेतना संरक्षण राहणार नाही तथापि पूर्वीच्या पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होण्यासाठी प्रचलित धोरणानुसार वाजवी कालावधी अनुज्ञेय असेल. 

संबंधित उच्च पदावरील बदलीसाठी वेतन संरक्षण लागू राहणार नाही. 

अन्य व्यवस्थापनाकडे निवड निवड झालेल्या नवीन पदाची व पूर्वीच्या व्यवस्थापनाकडी पदाची वेतनश्रेणी समान असल्यास कर्मचाऱ्यास पूर्वीच्या पदावरील सेवा जेष्ठता लागू होणार नाही तथापि पूर्वीच्या पदावरील सेवाग्राह्य धरून वरिष्ठ किंवा निवड श्रेणीचे लाभ देय होतील. 

एका व्यवस्थापनाकडून अन्य व्यवस्थापनाक उच्च वेतनश्रेणीतील पदावर नव्याने नियुक्ती झाल्यास शिक्षकास उच्च वेतन श्रेणीतील नवीन पदाच्या सेवाशर्ती तसेच सेवाजेष्ठता लागू होईल त्यामुळे पूर्वीच्या पदावरील सेवा वरिष्ठ किंवा निवड श्रेणीच्या लाभासाठी ग्राह्य होणार नाही. 

शासन निर्णय दिनांक 15 सप्टेंबर 2011 नुसार नवीन नियुक्ती प्रकरणी पूर्वीची सेवा सेवानिवृत्तीसाठी ग्राह्य राहील. 

पवित्र प्रणालीमार्फत नव्याने शिक्षण सेवक पदी निवड होऊन रुजू झालेल्या वेतन अनुदान प्राप्त नियमित शिक्षकाच्या वेतना संरक्षण मान्यता देण्याची कार्यवाही शिक्षणाधिकारी यांचे कडून करण्यात येईल सदर कार्यवाही होईपर्यंत संबंधितास सदर पदाचे मूळ वेतन देय राहील. 

सदर पदावरील नियुक्ती ही नवीन नियुक्ती असल्याने वेतनास संरक्षण देण्यात आले तरी नियमानुसार परिविक्षाधीन कालावधी लागू राहील. 

सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 3685/ 21 सेवा तीन दिनांक 26 ऑगस्ट 2021 च्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे. 


वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

2 Comments

  1. सर, माझे सप्टेंबर 2022 मध्ये जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला. होणाऱ्या नवीन भरतीमध्ये मी माध्यमिक शाळेवर रुजू झाल्यास माझी नवीन वेतन श्रेणी काय राहील, वेतन संरक्षण मिळेल का, वेतन वाढ मिळेल की नाही.?

    कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद 🙏🙏

    अमोल एल. वानखडे, 9545366050

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.