बदली अपडेट - जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात शिक्षणाधिकारी यांचे अत्यंत महत्त्वाचे कालमर्यादित आदेश

 बदली अपडेट - जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात शिक्षणाधिकारी यांचे अत्यंत महत्त्वाचे कालमर्यादित आदेश.


शिक्षक बदली पोर्टल वरील शिक्षकांचे प्रोफाइल मध्ये त्रुट्या असलेल्या शिक्षकांनी अपील टू सीईओ करणे बाबत नागपूरच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

ऑनलाइन बदली पोर्टलवर टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीम वर ज्या शिक्षकांना त्यांच्या प्रोफाईल मध्ये त्रुट्या आढळून आलेल्या होत्या अशा शिक्षकांनी Appeal to EO करण्याबाबतची सुविधा दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ते 3 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन बदली पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली होती.

त्या अनुषंगाने अपील टू eo केलेल्या शंकांची अपील दिनांक पाच डिसेंबर 2022 ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीत किंवा रिजेक्ट करून निकाली काढण्यात आलेल्या आहे. 

तरी देखील शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिलेला निर्णय मान्य नाही किंवा ज्यांना पुन्हा आपल्या शिक्षक प्रोफाइल बाबत अपील करायचे आहे अशा सर्व शिक्षकांनी दिनांक 11 12 व 13 डिसेंबर 2022 रोजी आपल्या लॉगिन वरून अपील टू सीईओ करण्याबाबतच्या सूचना सर्व शिक्षकांना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात.

कपिल टू सीईओ केलेल्या शिक्षकांचे अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिनांक 14 ते 17 डिसेंबर 2022 योग्य तो निर्णय देतील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल याची शिक्षकांनी नोंद घ्यावी.

सीईओ कडे अपील कशी करावी व्हिडिओ👇


तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांचे लॉगिन वरून आपले तालुका अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांचे प्रोफाइल पडताळणी करून संबंधिताचे प्रोफाइल मधील माहिती मध्ये तृप्या आढळून आल्यास संबंधित शिक्षकास तसे कळवून ऑनलाइन बदली पोर्टल द्वारे अपील टू सीईओ दाखल करण्यास कळवावे.

ऑनलाइन बदली पोर्टल वर चुकीच्या माहितीमुळे एखाद्या शिक्षकाची बदली झाल्याने न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास यास सर्वस्वी गटशिक्षणाधिकारी यांना संबंधित शिक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ऑनलाइन बदली पोर्टल वरील माहिती अद्यावत करण्यासंदर्भात ही शेवटची संधी असल्याने सर्वच शिक्षकांना न चुकता ऑनलाईन बदली पोर्टल वरील प्रोफाइल पडताळणी करण्याकरिता सुचित करण्यात यावे यानंतर कोणत्याही शिक्षकाच्या ऑनलाइन पोर्टल वरील माहिती मधील त्रुटी बाबत कोणताही आक्षेप किंवा तक्रार ऐकून घेतल्या जाणार नाही याची सर्व शिक्षकांना जाणीव करून देण्यात यावी असे निर्देश शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.