राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा संदर्भात आयुक्त परीक्षा परिषद यांचे प्रसिद्धी निवेदन.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या आयुक्त माननीय शैलाजा दराडे यांनी दिनांक 12 डिसेंबर २०२२ रोजी निर्गमित केलेल्या प्रसिद्धी निवेदनानुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एन एम एम एस 2022 23 इयत्ता आठवीसाठी परीक्षा दिनांक 21 डिसेंबर 2022 साठी विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्रे शाळा लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात येत असल्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस इयत्ता आठवी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रे दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी पासून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
संकेतस्थळ👇
https://www.nmms2023.nmmsmsce.in/School/SchoolLogin.aspx
वरील लिंक वर टच करून आपण आपल्या शाळेचे लॉगिन करून विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.
महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे एन एम एम एस विषयी आजचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments