गणवेश अपडेट - शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये पी एफ एम एस प्रणाली द्वारे प्राप्त परंतु परत गेलेले गणवेश अनुदान पुन्हा पी एफ एम एस द्वारेच प्राप्त होणार

 गणवेश अपडेट - शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये पी एफ एम एस प्रणाली द्वारे प्राप्त परंतु परत गेलेले गणवेश अनुदान पुन्हा पी एफ एम एस द्वारेच मिळणार


सन 2021 22 मध्ये बुलढाणा जिल्हा करिता समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश उपक्रमासाठी एकूण एक लक्ष 450575 लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता प्रति विद्यार्थी तीनशे रुपये एका गणवेशासाठी याप्रमाणे चार कोटी 21 लक्ष 72 हजार 400 रुपये फक्त प्राप्त होऊन गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर पी एफ एम एस प्रणाली द्वारे विड्रॉल लिमिट देऊन वितरित करण्यात आला होता तथापि पी एफ एम एस प्रणालीमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर सदर निधी खर्च होऊ शकला नाही तसेच 31 मार्च 2022 अखेरीस सदर निधी व्यपगत झाला.

सदर निधीबाबत 2021,22 या वर्षातील अहवाल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयात सादर करण्यात आला होता त्यानंतर तालुक्यात स्तरावरील गणवेश योजनेचा आढावा घेऊन मा प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचेकडे सन 2021 22 मधील गणवेश उपक्रमाच्या व्यपगत झालेल्या निधीबाबत मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

एम पी एस पी च्या आदेशान्वये गणवेश उपक्रमाचा सन 2021 22 मध्ये व्यापगत झालेला निधी जिल्हास्तरावर सन 2022 23 या वित्तीय वर्षात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच सदर निधीचा तात्काळ विड्रॉल लिमिट पीएफएमएस द्वारे विनीयोग करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत त्यानुसार परिषदेने दिलेल्या मार्गदर्शनानुसार सदर निधी गटशिक्षण अधिकारी यांचे मार्फत शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर वितळीत करण्या स मान्यता प्रधान करण्यात आली आहे सदर निधीचा उपयोग अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात यावा असे निर्देश शिक्षण अधिकारी प्राथमिक बुलढाणा यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
वरील शिक्षणाधिकाऱ्याच पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.