संवर्ग 1 च्या शिक्षकांच्या मनात असलेले काही प्रश्न व त्याचे शासन निर्णयानुसार स्पष्टीकरण/ उत्तरे..

 संवर्ग 1 च्या शिक्षकांच्या मनात असलेले काही प्रश्न व त्याचे शासन निर्णयानुसार स्पष्टीकरण/ उत्तरे....👇


आपली सेवा सुगम क्षेत्रात सलग दहा वर्षे झालेली आहे परंतु सध्याच्या शाळेत पाच वर्ष सेवा पूर्ण झाली नसली तरी. बदली प्रक्रिया संपल्यानंतर दुर्गम क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्यास माझी विस्थापित होऊन दुर्गम क्षेत्रात बदली होईल हे मी मान्य करतो.

असा पुढील प्रमाणे मेसेज आपणास दिसतो. 

तो मेसेज एक्सेप्ट ACCEPT करावा लागेल त्याशिवाय पुढील पोर्टल वरील प्रक्रिया पार पाडता येणार नाही. 



1) मला बदली नको तरीही फाॅर्म भरावा लागेल काय?

स्पष्टीकरण-जर तुम्हाला सध्याचे शाळेत 5 वर्ष व सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले असेल तर तुमचे नाव बदली पात्र यादीत येईल व तुम्हाला बदली नको असल्यामुळे फाॅर्म भरून नकार द्यावा लागेल.

2) संवर्ग 1 आहे,बदली हवी आहे, माझी बदली होईल का?

स्पष्टीकरण-तुम्ही संवर्ग एक आहात त्यामुळे तुम्हाला पाच वर्ष किवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष अशी अट नाही.त्यामुळे तुम्ही बदली फाॅर्म भरू शकता, बदली मिळेल परंतु तुम्हाला एका शाळेत तीन वर्ष सेवा पूर्ण केली असावी.

3) मी मागीतलेले गाव मिळाले नाही तर विस्थापित होईल का?

स्पष्टीकरण-तुम्ही संवर्ग 1 आहात त्यामुळे तुम्ही भरलेली गावे मिळाली नाही तर तुमची बदली होणार नाही सध्या आहात तीथेच राहाल.

4) पूर्ण 30 गावे भरणे आवश्यक आहे का?

स्पष्टीकरण-पूर्ण 30 गावे भरण्याचे बंधन नाही तुमच्या आवडीची जेवढी गावे भरायची आहेत तेवढी सुद्धा टाकून फाॅर्म सबमीट करू शकता.भरलेली गावे मिळाली नाही तर आहे त्याच शाळेत राहाल.

.5) शाळेत 5 वर्ष झाले नाही तर बदली मागता येईल का?

स्पष्टीकरण-होय संवर्ग 1 आहात त्यामुळे शाळेत पाच वर्ष झाले नाही तरी बदली पाहीजे असल्यास बदली मागता येईल कारण संवर्ग एक ला तशी अट नाही.(मात्र संवर्ग 1 मधून एकदा बदली घेतली तर पुढील तीन वर्ष बदली मिळणार नाही.

6) शाळेत 5 वर्ष झाले नाही,संवर्ग 1 आहे,बदली नको आहे तर नकाराचा फाॅर्म भरावा लागेल का?

स्पष्टीकरण-सध्याचे शाळेत पाच वर्ष झाले नाही आणि संवर्ग 1 मधून बदलीही नको आहे तर फाॅर्म भरायची गरज नाही.



2022 च्या बदल्या दिनांक 30 जून 2022 या तारखेनुसार केल्या जाणार आहेत. त्यामुळे या तारखेला सिस्टिमला व्हॅलीडेशन असणार आहे.


बदली बाबत आपणास कोणतीही शंका असल्यास दि.07/04/2021 चा शासन निर्णय व ग्राम विकास विभागामार्फत वेळोवेळी आलेली सूचना पत्रे काळजीपूर्वक वाचावीत तसेच विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकृत VDO काळजीपूर्वक पाहावेत/ऐकावेत.


विशेष संवर्ग भाग एक च्या शिक्षकांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया.


पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर पोर्टलच्या डाव्या मेनूमध्ये intra district टॅब दिसेल


या टॅब वर क्लिक केले की application form  टॅब दिसू लागेल.


त्यावर क्लिक केले की apply cadre 1. व  apply cadre 2


हे दोन टॅब दिसतील

जे शिक्षक विशेष संवर्ग 1 चा लाभ घेऊ इच्छिता त्यांनी apply cadre 1 वर क्लिक करावे व जे शिक्षक विशेष संवर्ग 2 चा लाभ घेऊ इच्छितात त्यानी apply cadre 2  वर क्लिक करावे.


Apply cadre 1  वर क्लिक केले की एक आपल्याला स्विकरण स्विकारावे लागेल.


विशेष वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांची बदली ही त्यांच्या खालील प्राधान्य क्रमानुसार होईल.


शासन निर्णय 7 एप्रिल 2021 चे आदेशातील

व्याख्यातील प्राधान्य क्रमानुसार

त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार

जन्मतारखेप्रमाणे

व आडनावातील पहिल्या इंग्रजी, आद्याक्षराप्रमाणे

वरील प्राधान्य क्रमानुसार बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल.


तसेच विशेष स़वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे प्रमाणपत्र आपल्या वरिष्ठ कार्यालयाला जमा करणे अनिवार्य आहे तसेच हे प्रमाणपत्र जर अवैद्य ठरल्यास किंवा प्रमाणपत्र देण्यास असमर्थ ठरल्यास वरील शिक्षकांचा बदली अर्ज रद्द करण्यात येईल.


वरील स्विकारण स्विकारल्यानंतर विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना बदली अर्ज दिसू लागेल.


या अर्जामध्ये शिक्षकाचे नाव ,आडनाव, शालार्थ आयडी,व शाळेचा यु-डायस क्रमांक दिसून येईल.


त्याखाली ज्या शिक्षकांचे नाव बदली पात्र यादीमध्ये आलेले असून त्यांना बदलीतून सूट हवी असेल म्हणजेच बदली नको असेल तर अशा शिक्षकांनी dropdown मधून Yes हा पर्याय निवडावा.


ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून सूट नको असेल म्हणजेच बदली हवी असेल  तर अशा शिक्षकांनी dropdown मधून No हा पर्याय निवडावा*


त्याखालील dropdown मधून विशेष संवर्गाचा प्रकार निवडावा.


त्या ठिकाणी Self व Spouse हे दोन पर्याय दिसतील.


Self म्हणजे विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांनी स्वतः संदर्भात असलेल्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या संबंधित असलेला आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा.


Spouse म्हणजे ज्या शिक्षकांचे जोडीदार आजाराने ग्रस्त असतील त्यांनी Spouse हा प्रकार निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या जोडीदाराच्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा.


व आपला अर्ज सबमिट करावा


शिक्षकाचे वय 53 वर्ष किंवा 53 वर्षापेक्षा जास्त झाले असेल  व त्यांचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर अशा  शिक्षकांना बदलीतून सूट हवी असेल तर त्यांनी Yes हा पर्याय निवडून Self मधील dropdown मधील 13 क्रमांकाचा मुद्दा प वयाने 53 वर्ष झालेले कर्मचारी हा पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा


कोणत्याही शिक्षकाला फक्त एका वेळी एकाच संवर्गाचा लाभ मिळू शकेल.


 एखाद्या शिक्षकांनी संवर्ग एक मध्ये अर्ज केला असेल तर त्याला संवर्ग दोन चा लाभ मिळणार नाही पर्यायाने आपल्या जोडीदार संवर्ग दोन मध्ये असेल तर तो विस्थापित होईल.


विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया.


जे शिक्षक संवर्ग दोन मध्ये येतात त्यांनी अर्ज भरतांना Apply cadre 2 या टॅब वर क्लिक करावे.


क्लिक केल्यानंतर त्याखालील एक स्विकरण स्विकारावे लागेल त्याशिवाय अर्ज दिसणार नाही.


ते खालील प्रमाणे

विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे अंतराचे प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला देणे अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र देण्यास शिक्षक असमर्थ असेल तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.


वरील प्रकारचे स्विकरण स्विकारल्यानंतर शिक्षकाचा अर्ज स्क्रीनवर दिसून येईल.


अर्जावर शिक्षकाचे नाव ,आडनाव ,शालार्थ आयडी व शाळेचा यु डायस क्रमांक दिसून येईल.


त्याखालील आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कार्यालयातील किंवा शाळेतील अंतर द्यावे लागेल हे अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल

त्यानंतर खालील दिलेल्या dropdown मधून आपल्या विशेष संवर्ग भाग दोन चा प्राधान्यक्रम निवडावा लागेल.


वरील पर्याय विशेष संवर्ग भाग दोनच्या व्याख्येतील प्राधान्य क्रमाने असतील.


जर तुम्ही 1.9.1 पहिला पर्याय पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद चे कर्मचारी हा पर्याय निवडल्यासनिवडल्यास.


त्याखालील जोडीदाराचा शिक्षक प्रकार निवडावा लागेल.


त्याखालील जर आपण Primary हा पर्याय निवडला तर तेथे जोडीदाराचा मोबाईल क्रमांक किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल हा पर्याय दोन्ही पती-पत्नी जिल्हा परिषद चे शिक्षक असून या बदली प्रक्रियेमध्ये असतील अशा शिक्षकांसाठी आहे.


त्याखाली आपल्याला एक स्विकारण स्विकारावे लागेल


ते खालील प्रमाणे

आपल्या जोडीदाराने, संवर्ग एक मधून अर्ज भरलेला असल्यास व आपण पती-पत्नी, एकत्रीकरण अंतर्गत विशेष वर्ग भाग दोन मधून अर्ज करत असल्यास दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य असल्यामुळे आपण विस्थापित होऊ शकता हे मला मान्य आहे.


वरील स्विकारण स्विकारल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव, शाळेचे नाव ,शाळेचा यु-डायस क्रमांक स्क्रीनवर दिसून येईल.


त्याखालील सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट होईल.


जर आपण जोडीदाराचा शिक्षक प्रकार other than primary हा पर्याय निवडल्यास म्हणजेच हा पर्याय सुद्धा प्राधान्यक्रमातील 1.9.1 एक मधील पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील त्यापैकी एक शिक्षक असेल व एक जिल्हा परिषद चा शिक्षक अथवा कर्मचारी असेल अशांकरिता लागू आहे.


आपणास जोडीदारचा मोबाईल नंबर किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल.


त्यानंतर जोडीदार चे नाव, शाळेचे नाव, युडायस क्रमांक व उपलब्ध असलेली माहिती टाकून सबमिट करावाकरावा.


आपणास जर पहिल्या पर्याय व्यतिरिक्त (1.9.2 ते 1.9.6 )दुसरा कोणताही पर्याय असल्यास तो पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा.


तसेच विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांनी दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य आहे जर दोघांपैकी एकाने संवर्ग एक मधून व दुसऱ्याने संवर्ग दोन मधून अर्ज केल्यास संवर्ग दोन मधून अर्ज करणारा शिक्षक विस्थापित होऊ शकतो.


पोर्टलवर फॉर्म कसा भरावा याबाबत विन्सिस सॉफ्टवेअर कंपनी कडून पाठवलेला VDO काळजीपूर्वक पाहावा..


शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात दि. 7/4/2021 च्या जी आर नुसार स्पष्टीकरण...

(माहितीस्तव)

 

( विनम्र सूचना- सदर माहिती मी मला जे समजले तशी दिली आहे, मी सांगतो तेच बरोबर आहे असा माझा दावा नाही.)


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.