पद भरती वरील निर्बंध शिथिल! सरकारी नोकर भरतीचा मार्ग मोकळा! - शासन आदेश

 पद भरती वरील निर्बंध शिथिल! सरकारी नोकर भरतीचा मार्ग मोकळा! - शासन आदेश! 


31 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने  शासन निर्णय निर्गमित करून महाराष्ट्रातील पदभरतीवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


राज्यात शासनाच्या विविध विभाग व कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध अंतिम निश्चित करण्याच्या सूचना वित्त विभागाच्या दिनांक 11 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहे. सुधारित आकृतीबंध अंतिम करताना वित्त विभागातील विविध कार्यासनांकडून प्रस्तावांची छाननी करण्यात येते. त्यानंतर सदर प्रस्ताव वित्त विभागाच्या दिनांक नऊ जून 2017 च्या शासन निर्णयान्वय गठीत उपसमती पुढे छाननी व शिफारसी साठी सादर करण्यात येतात. उपसमितीच्या शिफारशी सह सदर प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाच्या दिनांक दहा सप्टेंबर 2001 च्या शासन निर्णयान्वये गठित उच्चस्तरीय सचिव समिती पुढे सादर करण्यात येतात त्यापैकी काही प्रस्ताव आवश्यकतेनुसार मंत्रिमंडळापुढे सादर करावे लागतात सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यासंबंधीच्या प्रक्रियेतील वरील टप्पे विचारात घेता त्यास बराच कालावधी लागतो.

वित्त विभागाच्या 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित आकृतीबंध अंतिम निश्चित झालेल्या विभाग कार्यालयांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100% पदे भरण्याची मुभा देण्यात आली असून अन्यसंवर्गातील रिक्त पदांच्या 50% पदे भरण्याची मुभा आहे ज्या विभाग कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला नाही अशा विभाग अथवा कार्यालयांना पदे भरण्यास उपसमितीची मान्यता आवश्यक असते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष अंदाजे 75 हजार सरळ सेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे. सदर पदे भरण्याची उद्दिष्ट साध्य करणे शक्य व्हावे यासाठी केवळ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षातील पदभरती करिता ज्या प्रशासकीय विभागांना वित्त विभागाच्या दिनांक 11 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम मंजूर केलेला नाही अशा विभाग किंवा कार्यालयांन मधील परीदेखील भरतीसाठी उपलब्ध होण्याकरिता वित्त विभागाच्या दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाने विहित केलेले पदभरती बाबतचे निर्बंध शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

वरील दिनांक 30 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयामधील पद भरती वरील निर्बंधामध्ये शितल देऊन खालील प्रमाणे पदभरतीस मान्यता देण्यात येत आहे.

ज्या विभागांचा अथवा कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे अशा विभाग अथवा कार्यालयांमधील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यास मुभा देण्यात येत आहे.

ज्या विभक्त कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभाग अथवा कार्यालयांमधील गट-अ गट ब व गट क मधील वाहनचालक व गट ड मधील पदे बघून सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यास उभा देण्यात येत आहे.

वरील प्रमाणे शीतलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहील त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 30 सप्टेंबर 2022 अन्वय करण्यात येईल.

दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दिनांक 11 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे आकृतीबंध अद्याप अंतिम मंजूर केलेले नाहीत त्या प्रशासकीय विभागांनी त्यांचा व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांमधील पदांचा आढावा घेऊन उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर करण्याची कार्यवाही तत्परतेन पूर्ण करावी.

वरील प्रमाणे पदभरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सर्व विभागांना निर्देश दिले आहेत.






बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.