PM-POSHAN Update - शालेय पोषण आहार (PM-POSHAN) दरामध्ये सुधारणा करणे बाबत दिनांक 15 नोव्हेंबर 2022 चा शासन आदेश

PM-POSHAN Update - शालेय पोषण आहार (PM-POSHAN) दरामध्ये सुधारणा करणे बाबत दिनांक 15 नोव्हेंबर 2022 चा शासन आदेश.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत म्हणजेच शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणे बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पूर्वीची शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिने युक्त तसेच सहावी ते आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो.

केंद्र शासनाने दिनांक 14 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशान्वये सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी अण्णा शिजवण्याच्या दरात 10.99% वाढ करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार संदर्भ दिन दिनांक 24 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णय अन्न शिजवण्यासाठी दरासाठीचे प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रुपये 4.97 आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी रुपये 7.75 याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती. केंद्र शासनाने दिनांक ७ ऑक्टोबर 2022 च्या शासन आदेशानुसार 2022 23 आर्थिक वर्षाकरिता दिनांक 1 ऑक्टोबर 2022 पासून अन्न शिजवण्याच्या दरात 9.6% दरवाढ मंजूर केली आहे त्यानुसार पुढील प्रमाणे शासन निर्णयान्वय विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार दरवाढ लागू करण्यात येत आहे.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.