रोखवही (Casebook) लिहिण्याबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना बाबत शासन निर्णय व संपूर्ण मार्गदर्शिका..

 रोखवही (Casebook) लिहिण्याबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना बाबत शासन निर्णय व संपूर्ण मार्गदर्शिका.. 


विविध कार्यालयातील रोखवहींची अचानक तपासणी करण्यात आल्यावर तसेच महालेखाकार कार्यालयाकडून महसूल व वन विभागातील कार्यालयाच्या लेखापरीक्षणात देखील रोख वहिबाबत आक्षेप घेण्यात येतात. महालेखाकार कार्यालयाच्या आक्षेपात तसेच मंत्रालयीन निरीक्षण पथकाच्या तपासणीमध्ये रोख वहीत विहित नियमानुसार न लिहिणे, रोख वही अपूर्ण असणे, आवश्यक त्या सर्व रोख वह्या न ठेवणे, रोख वहीतील महिना अखेरच्या शिल्लक रकमेचा सविस्तर गोषवारा न काढणे, प्रत्येक महिना अखेर रोखवहीतील रक्कम व बँकेतील शिल्लक रक्कम यांचा तळामेळ न घेणे, बँक विवरणपत्र म्हणजेच बँक स्टेटमेंट बँकेकडून दरमहा न आणणे, काही आवश्यक त्या दुय्यम रोख वह्या न ठेवणे, रोख वहीत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी नसणे, रोखवहीचा कार्यभार हस्तांतरित न करणे, प्रमाणकांची नोंदवहीत नोंद न घेणे, जमा रकमांची, परत आलेल्या रकमांची रोख वहीत नोंद न घेणे इत्यादी बाबी वारंवार निदर्शनास येत आहे. प्रत्येक कार्यालयात महालेखाकार कार्यालयाकडील एकूण अक्षतांपैकी अंदाजे 20% टक्के इतके परिच्छेद हे रोख वही किंवा रोखवहीशी निगडित बाबी विषयीचे आहेत असे आढळून आले आहे.

रोख वही व तत्सम परिच्छेदांचे अवलोकन केले असता रोख वही संदर्भातील परिच्छेद लेखापरीक्षण अहवालामध्ये येणे ही बाब योग्य नाही याबाबत रोख वहीबाबत संबंधित आहरण व सम वितरण अधिकारी कर्मचारी यांची उदासीनता दुर्लक्ष वरिष्ठ कार्यालयाकडून सदर बाबतीत नियमित आढावा न घेणे नियमित व प्रभावी अंतर्गत लेखापरीक्षण न होणे इत्यादी बाबी कारणीभूत आहे असे दिसते. रोख वही बाबतचे आक्षेप हे मोठ्या प्रमाणात खर्चाच्या लेखापरीक्षणात येत असले तरी जमेच्या लेखापरीक्षणात देखील सदरचे आक्षेप घेतले जातात तसेच रोख वही पूर्ण करून टाळामेळ घेतल्याशिवाय महालेखाकार कार्यालयाकडून सदरचा आक्षेप वगळला जात नाही.

रोख वही लिहिण्याबाबत शासनाकडून परिपत्रका अन्वय यापूर्वी सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. महालेखाकार कार्यालयाकडून करण्यात येणाऱ्या लेखापरीक्षणात रोख वहीबाबत काढलेले आक्षेप व विशेष निरीक्षण पथकाच्या तपासणी दरम्यान आढळून आलेल्या कृतींचा विचार करता रोख वही लिहिण्याबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना पुस्तिकेच्या स्वरूपात पत्रासोबत जोडण्यात आलेल्या होत्या, तसेच पूरक सूचना देखील निर्गमित करण्यात आल्या होत्या. परंतु नियंत्रक अधिकाऱ्यांकडून सदरच्या सूचना त्यांच्या अधिनिस्त कार्यालयांना दिल्या गेल्या नसल्याची बाब विशेष निरीक्षण पथकाच्या तपासणी मध्ये निदर्शनास आल्या आहेत व परिणामी अधिनिस्त कार्यालयाकडून रोख वही अजूनही योग्य प्रकारे लिहिली जात नाही. त्यामुळे रोपोही बाबतच्या सूचना या परिपत्रकाच्या स्वरूपात निर्गमित करण्यात येत आहे.

रोख वही दररोज लिहून त्यावर स्वाक्षरी करणे ही संबंधित कर्मचारी किंवा आहरण व संवितरण अधिकारी किंवा कार्यालय प्रमुख यांची जबाबदारी आहे. रुखवही ही अपूर्ण असल्यामुळे जमा किंवा खर्चाचा हिशेब न लागणे बँकेत अथवा रोख वहीत मोठ्या प्रमाणात अखर्चित रकमा असणे व त्याचा तळामिळ न घेतल्यामुळे सदरची अखर्चित रकमा शासनाच्या खाती जमा न करता येणे इत्यादीमुळे अशा कार्यालयात आर्थिक अनियमितता अफरातफर अपहार इत्यादी बाबी संभवतात किंबहुना काही कार्यालयात असे प्रकार झालेले आहेत. कार्यालयातील रोख वही ही अद्यावत अचूक नियमानुसार लिहिलेली व परिपूर्ण असावी कारण रोख वही हा त्या कार्यालयाच्या व्यवहाराचा आरसा असतो त्यामुळे रोख वही लिहिण्याबाबतच्या सर्वसाधारण सूचना सोबत जोडल्याप्रमाणे विहित केल्या आहेत. सदरच्या सूचना ह्या फक्त मार्गदर्शक स्वरूपाच्या असून त्यासंबंधीच्या शासन नियमातील मूळ तरतुदीचे पालन होईल याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सर्व नियंत्रक अधिकारी यांना कळविण्यात येते की त्यांनी त्यांच्या व त्यांच्या अधिनिस्त कार्यालयांच्या रोख वह्या लिहिताना किंवा ठेवताना मुंबई वित्तीय नियम 1959 महाराष्ट्र कोषागार नियम 1968 आणि त्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन होते की नाही याकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे. याबाबत कसूर करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे वर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कार्यवाही वेळीच करण्यात यावी.




वरील शासन निर्णयासह रोख वहीबाबत सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना पुस्तिका संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.