उपशिक्षक/ सहाय्यक शिक्षक/ सहाय्यक अध्यापक देखील विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी पात्र - शिक्षण अधिकाऱ्यांचे पत्र

 उपशिक्षक/ सहाय्यक शिक्षक/ सहाय्यक अध्यापक देखील विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी पात्र - शिक्षण अधिकाऱ्यांचे पत्र.


पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका शिक्षकांच्या एकत्रित सेवाजेष्ठतेच्या आधारे योग्य उमेदवारांमधून पदोन्नतीने विस्ताराधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन पदी पदोन्नती देण्यासाठी सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे.


सदर पत्रात माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांनी विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी दोन पदी पदोन्नती देणे कामी जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका यांचेकडील प्राप्त माहितीनुसार पात्र उपशिक्षक पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक या संवर्गातील सेवा जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आलेली आहे. सदरची यादी विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी दोन चे पदोन्नती तात्पुरती यादी म्हणून तयार करण्यात आलेली असून ती जिल्हा परिषद पुणे च्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.


सदर सेवा जेष्ठता यादीचे अवलोकन करण्यात येऊन यादीतील कर्मचाऱ्यांची तक्त्यामधील संपूर्ण माहिती अचूक असल्याबाबत संबंधिताचे मूळ सेवा पुस्तकात शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेबाबत गुणपत्रक जात वैधता प्रमाणपत्र स्थायित्व ला आदेश इत्यादी वरून खात्री करण्यात यावी.

तसेच सदर यादी व्यतिरिक्त आपले तालुक्यातील एखाद्या पात्र उमेदवाराचे नाव यादीत नसेल त्याबाबत या कार्यालयास तात्काळ अवगत करण्यात यावे संबंधितांची संपूर्ण नसती या कार्यालयास सादर करण्यात यावी.


जे उपशिक्षक (सहाय्यक शिक्षक/अध्यापक)/पदवीधर शिक्षक/मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख यांनी बीए व बीएड मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत व जे कर्मचारी दिनांक 17 जानेवारी 1986 व त्यापूर्वी नियुक्त झालेले आहेत अशाच कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्यात यावी.

तसेच यादीतील सर्व कर्मचाऱ्यांची बीए व बीएड परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक सादर करण्यात यावे.

वरील प्रमाणे सविस्तर निर्देश सदर सेवा जेष्ठता यादी सोबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांनी दिले आहे.

सदर यादी सोबत असलेल्या पत्रात फक्त पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख किंवा मुख्याध्यापक यांनाच विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी ग्राह्य धरण्यात आले नसून सहाय्यक शिक्षक अथवा उपशिक्षक यांना देखील विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी ग्राह्य धरण्यात आले आहे.वरील शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांचे पत्र व सेवा जेष्ठता यादी संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.