दिवाळी अगोदर अनुदान वितरणासाठी शनिवारी व रविवारीही कार्यालय सुरू राहणार - शिक्षण संचालकांचे आदेश

 दिवाळी अगोदर अनुदान वितरणासाठी शनिवारी व रविवारीही कार्यालय सुरू राहणार - शिक्षण संचालकांचे आदेश. 


महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी च्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक व सर्व क्षेत्रीय कार्यालय दिनांक 15 ऑक्टोबर 2022 वार शनिवार व दिनांक 16 ऑक्टोबर 2022 वार रविवार या सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्वयंपाक ही तथा मदतनीस यांचे मानधन शाळांची विविध प्रकारची देयके व इतरदेयकांची दिवाळीपूर्वी अदागयी करणे आवश्यक आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून सदरचा निधी विविध बाबी करिता जिल्ह्यांच्या आवश्यकतेनुसार जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदरचा निधी विहित वेळेत लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याकरिता उत्क्त प्रमाणे नमूद सुट्टीच्या दिवशी सर्व प्रशासकीय व अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे कामकाज करणे आवश्यक आहे. 

सबब संदर्भंकित विषयांमध्ये नमूद केल्यानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक व सर्व क्षेत्रीय कार्यालय शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022 व रविवार दिनांक 16 ऑक्टोबर 2022 या सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात यावी तसे आदेश त्वरित सर्व क्षेत्रीय कार्यालयांना निर्गमित करण्यात यावे.  जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले अनुदान दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांपर्यंत वर्ग होणे आवश्यक आहे सदर बाब विलंब झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शिक्षण अधिकारी प्राथमिक यांची राहील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी. 

वरील प्रमाणे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र कक्ष यांचेकडून देण्यात आलेले आहेत. वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.