जिल्हा अंतर्गत बदली महत्त्वाचे - संवर्ग एक दोन तीन चार विवरण पत्र बाबत स्पष्टीकरण

 जिल्हा अंतर्गत बदली महत्त्वाचे - संवर्ग एक दोन तीन चार विवरण पत्र बाबत स्पष्टीकरण.


जिल्हा परिषद शिक्षक संवर्गातील ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया केव्हाही सुरू होऊ शकते त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांसाठी जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुधारित धोरण 7 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहे.

जिल्हा अंतर्गत बदली सुधारित धोरण शासन निर्णय


जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होण्याअगोदर म्हणजेच ऑनलाईन बदलीचे अर्ज करणे सुरू होण्याअगोदर दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रामविकास विभागाने एका परिपत्रकाद्वारे या संदर्भातील अधिकचे स्पष्टीकरण दिले आहे.

जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात 12 ऑक्टोबर 2022 चे पत्र


वरील 12 ऑक्टोबर 2022 च्या पत्रामुळे जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत काही बाबी स्पष्ट होणे गरजेचे आहे. राज्यभरातून याबाबत मार्गदर्शन मिळवण्यासाठी किंवा नेमके काय करावे हे ठरवण्यासाठी काही कॉल/मेसेज प्राप्त झाले आहेत. यावरून असे स्पष्ट होते की बऱ्याच शिक्षक बांधवांना नेमके काय करावे हे कळत नाही आहे.


सदर बाबी संदर्भात आम्हाला जे समजले ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सदर पत्रात समजून घेण्यासारखी बाब पुढील प्रमाणे.

 "विवरण पत्र एक बदलीस पात्र शिक्षक मध्ये पृष्ठ क्रमांक 17 व नमूद केल्याप्रमाणे मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा किंवा मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असून अशा शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहतील"


जर एखाद्या शिक्षकांनी सदर विवरणपत्र एक मध्ये नमूद केलेला उक्त अ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदली वेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागी अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्णतः प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवा जेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही. मात्र जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरणपत्र एक मध्ये नमूद केलेला उक्त आ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार व सेवा जेष्ठतेने बदली मिळू शकेल.वरील संपूर्ण संवर्ग चार साठी लागू असलेले नमुना विवरणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


वरील विवरणपत्र हे फक्त संवर्ग चार साठी लागू असून जे शिक्षक संवर्ग चार मध्ये येतात व शाळेमधून बदली पात्र आहे अशा शिक्षकांसाठी वरील दोन पर्याय उपलब्ध आहेत. ज्या शाळेत आहे त्या शाळेतून बदली नको असल्यास परंतु प्रशासकीय कारणास्तव बदली होत असल्यास सदर शिक्षकाला उपलब्ध असलेल्या कोणत्याही शाळेवर नियुक्ती दिली जाऊ शकते असे यामधून स्पष्ट होते.


त्यामुळे अशा संवर्ग चार मध्ये येणाऱ्या शिक्षकांना आम्ही विवरणपत्रातील आ) हा पर्याय निवडून आपल्या पसंतीनुसार व सेवा जेष्ठतेनुसार गाव घेऊन सोयीच्या ठिकाणी बदली करावी असा सल्ला राहील. यामध्येही आपल्या सेवाजेष्ठतेवर आपल्याला कोणती शाळा मिळू शकते याबाबत विचारपूर्वक पसंतीक्रम देणे गरजेचे आहे.


संवर्ग एक/दोन/तीन यांनी याबाबत चिंता करण्याचे कारण नाही. कारण त्यांना त्याच शाळेवर राहता येईल त्यांना कोणीही खूप देऊ शकणार नाही व प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली देखील होणार नाही. त्यामुळे या तीन संवर्गात येणाऱ्या शिक्षकांनी याची चिंता करण्याची गरज नाही.


संवर्ग एक साठी भरून द्यावयाचे विवरणपत्र नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


संवर्ग दोन साठी भरून द्यावयाचे विवरणपत्र नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


संवर्ग तीन साठी भरून द्यावयाचे विवरणपत्र नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.