बदली अपडेट - जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया 2022 संदर्भातील महत्त्वाचे अपडेट

बदली अपडेट - जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया 2022 संदर्भातील महत्त्वाचे अपडेट.


जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्यासाठी माननीय ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांची परवानगी मिळाली आहे.
कोणत्याही क्षणी ग्रामविकास विभाग जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्या संदर्भात आदेश निर्गमित करू शकतो.



जिल्हांतर्गत बदलीसाठी पोर्टल वरील प्रक्रिया पूर्ण झालेली असून ग्रामविकास विभागाच्या आदेशाची वाट विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड हे बदली प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाहत आहेत.





माननीय ग्रामविकास मंत्री यांची हिरवी झेंडी मिळताच जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार! 

बदली प्रक्रिया संदर्भात ग्रामविकास विभागाकडून माहिती घेतली असता जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू करणे बाबतचे ग्रामविकास विभागाचे पत्र तयार आहे व माननीय ग्रामविकास मंत्री यांची सहमती मिळाली की पत्र निर्गमित होईल व बदली प्रक्रिया सुरू होईल अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

ग्रामविकास विभागाकडून बदली संदर्भातील शासन निर्णय निर्गमित होताच जिल्हाअंतर्गत बदलीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा संवर्गनिहाय उपलब्ध होईल,  ग्रामविकास विभागाने या अगोदरच परिपत्रक निर्गमित करून कोणत्या संवर्गासाठी किती दिवस अर्ज भरण्यासाठी उपलब्ध होतील याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.

जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदल्या केव्हा सुरू होतील? 
जिल्हांतर्गत ऑनलाइन बदल्या यावर्षी होतील की नाही? 
याबाबत अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांकडून विचारणा होत आहे.

ज्यांच्या मनात असे संभ्रम आहेत त्यांना आम्ही असे सांगू इच्छितो की जिल्हांतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी संपूर्ण तयारी झालेली असून ग्रामविकास मंत्र्यांची हिरवी झेंडी मिळताच जिल्हा अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू होणार आहे याबाबत निश्चिंत रहावे.

2018 मध्ये झालेल्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये शासनाविरोधात अनेक न्यायालयीन प्रकरणे समोर आलेली असल्यामुळे यावेळी कुठलीही तांत्रिक बाजू मागे न राहता निर्दोष पणे बदली प्रक्रिया पार पडावी यासाठी अतिशय काळजीपूर्वक बदली प्रक्रिया राबविणे सुरू असल्यामुळे बदली प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत आहे.




 




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏






Post a Comment

1 Comments

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.