जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसाठी सुधारित धोरण निश्चित करणारा ग्राम विकास विभागाचा दिनांक 7 एप्रिल 2021 चा शासन निर्णय.

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसाठी सुधारित धोरण निश्चित करणारा ग्राम विकास विभागाचा दिनांक 7 एप्रिल 2021 चा शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक सात एप्रिल 2021 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसाठी सुधारित धोरण शासन निर्णयाद्वारे पुढील प्रमाणे निश्चित केले आहे.

शासन यापूर्वी 15 मे 2014 च्या शासन निर्णय तसेच दिनांक दोन जुलै 2014 दिनांक 1 जानेवारी 2017 च्या शुद्धिपत्रकांमुळे जिल्हा परिषदेच्या गट क वर्ग तीन वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यात बाबत धोरण निश्चित केलेले होते.

सदर धोरणानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणारे शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात येत होत्या. परंतु शिक्षक संवर्गाची मोठी संख्या त्यांचे इतर संवर्गापेक्षा असलेले कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली बबत स्वतंत्रपणेवेगळ्याने विचार करून शासनाने शासन निर्णयातून शिक्षक संवर्ग वगळण्यात आलेला असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रिये बाबत ही जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाईन बदली प्रणाली द्वारे दिनांक 27 2 2017 च्या शासन निर्णयान्वये करण्याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आले.

आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जिल्हा परिषद शाळांमधील घडणारी पटसंख्या अध्यापनातील स्तरीय शिक्षकांना काम करीत असताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन जिल्हा परिषद शिक्षकांची नव्याने बदली धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार पुढील प्रमाणे धोरण निश्चित करण्यात येत आहे.

शासनाने शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने शासन निर्णयातून शिक्षक संवर्ग यापूर्वीच वगळण्यात आलेला असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रिये बाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आले होते ते सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून आता जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक संवर्गासाठी जिल्हाअंतर्गत बदलांची सुधारित धोरण या शासन निर्णय खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

व्याख्या:-

अवघड क्षेत्र.

परिशिष्ट एक मध्ये नमूद करण्यात आलेल्या सात बाबींपैकी किमान तीन बाबींची निकषांची पूर्तता होईल असे गाव शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.

सर्वसाधारण क्षेत्र

अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.

बदली वर्ष

ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत बदला करावयाचे आहेत ते वर्ष.

बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा.

अवघड क्षेत्रनिहाय व सर्व सदनक्षेत्रनिहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मी पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.

शिक्षक:-

या शासन निर्णयाची प्रयोजन शिक्षक म्हणजेच जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक.

बदल्यांचे अधिकार प्राप्तशिक्षक.

बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.

विशेष संवर्ग शिक्षक भाग एक:-

खाली नमूद संवर्गाची शिक्षक हे विशेष संवर्ग भाग एक म्हणून गणले जातील.

1) पक्षघाताने आजारी शिक्षक (पॅरॅलिसिस) 

2) दिव्यांग शिक्षक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14 जानेवारी 2011 मधील नमूद प्राप्त प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक) मानसिक विकलांग मुलाची व दिव्यांग मुलाचे पालक पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ तसेच ज्या शिक्षकांची जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.

3) हृदय शस्त्रक्रिया झालेली शिक्षक.

4) जन्मापासून एकच मित्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक डायलिसिस सुरू असलेले शिक्षक.

5) यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.

6) कॅन्सर कर्करोगाने आजारी शिक्षक.

7) मेंदूचा आजार झालेले शिक्षक.

8) थैलीसेमिया विकार ग्रस्त मुलाचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दृश्यामुळे उद्भवणारे आजार {उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency इतर आजार)} पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ.

9) माजी सैनिक तसेच आजी-माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी विधवा.

10) विधवा शिक्षक.

11) कुमारीका शिक्षक.

12) परीत्यक्ता  घटस्फोटीत महिला शिक्षक.

13) वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक.

14) स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्यसैनिक ह्यात असेपर्यंत.


खालील आजारांनी ज्या शिक्षकांची जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक.

हृदय शस्त्रक्रिया झालेली.

 जन्मापासून एकच मित्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक डायलिसिस सुरू असलेले. 

यकृत प्रत्यारोपण झालेले .

 कॅन्सर कर्करोगाने आजारी.

 मेंदूचा आजार झालेले .

थैलीसेमिया विकार ग्रस्त.


वडील ग्रामविकास विभागाचा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात सुधारित धोरण निश्चित केलेला शासन आदेश संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.