विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग ३ श्रेणी २ या संवर्गातील पदे पदोन्नतीने भरणे बाबत शिक्षणाधिकारी यांचे पत्र

 विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग ३ श्रेणी २ या संवर्गातील पदे पदोन्नतीने भरणे बाबत शिक्षणाधिकारी यांचे पत्र. 


सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी दिनांक 19 जुलै 2022 रोजी विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणीतून या संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरणे बाबत पुढील प्रमाणे पत्र निर्मित केले आहे.


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्याकडे दिनांक 10 जून 2014 च्या अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी दोन या संवर्गातील भरती बाबत 50 25 25 हे प्रमाण निश्चित केले आहे सदर संवर्गात 39 पदे मंजूर असून 25 टक्के प्रमाणे पदोन्नतीसाठी दहा पदे उपलब्ध होत आहे. (आता शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार आदेशानुसार 50 टक्के पदे पदोन्नतीने भरू शकतात) अधिसूचनेनुसार सदरची पदे जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिकांमधील शिक्षकांच्या एकत्रित सेवाजेष्ठतेच्या आधारे भरणे बाबत नमूद केले आहे.. 

त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की जिल्हा परिषद सांगली अधिनिष्ठ अधिकारी वर्ग तीन श्रेणी दोन या संवर्गातील पदोन्नतीच्या कोट्यातील पदे भरण्यासाठी आपले अधिनिस्त प्राथमिक माध्यमिक शाळेवरील शिक्षक म्हणून तीन वर्ष इतकी सेवा पूर्ण केलेल्या सदर पदावर पदोन्नती इच्छुक असलेल्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए बीकॉम बीएससी ही पदवी किमान 50 टक्के गुणासह उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीएड अथवा समक्ष पदवी किमान 50% गुणासह तीन आणि मान्यता प्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय मधील शासनमान्य पदावरील समक्ष प्राधिकार्‍यांनी वैयक्तिक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव ही हरतापूर्ण करीत असलेल्या सहाय्यक शिक्षक मुख्याध्यापक यांची खालील कागदपत्रांसह प्रस्ताव व विकल्प या कार्यालयास आठ दिवसाचे आत सादर करण्यात यावे याबाबत टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.


आवश्यक कागदपत्रे:-

मूळ नियुक्ती आदेशाची प्रत, 

प्रथम सेवेत हजर झालेल्या सेवा पुस्तकांमधील नोंदीची प्रत, 

संबंधित विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर पदोन्नतीसाठी इच्छुक असल्याबाबतचे संमती पत्र विकल्प पत्रक, 

संगणक परीक्षा उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र.

शैक्षणिक अरतेबाबतची सर्व गुणपत्रक प्रमाणपत्र, 

स्थायित्व प्रमाणपत्र आदेशाची प्रत, 

हिंदी मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट घेतलेल्या आदेशाची प्रत, 

नियुक्ती जात प्रवर्गांमधून असल्यास जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, 

मागील तीन वर्षाची मतादायित्व विवरणपत्र सादर केले बाबतचा दाखला, 

विभागीय चौकशी न्यायालयीन कार्यवाही फौजदारी गुन्हा नोंद नसल्याबाबतचा दाखला, 

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, 

संशयास्पद सचोटी नसल्याबाबतचा दाखला, 

अनिवार्य प्रशिक्षण झालेबाबतचे प्रमाणपत्र, 


परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झालेल्या आदेशाची प्रत, 

सेवा पुस्तकांमधील पहिल्या पानाची प्रत, 

मागील पाच वर्षाची गोपनीय अहवालाच्या छायांकित प्रती, 

संबंधित पूर्वी दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी विनापरवानगी अनधिकृत परागंद बेपत्ता नसले बाबतचा दाखला, 

वयाच्या 50 अथवा 55 वर्षानंतर सेवेत ठेवण्याबाबत पुनर्विलोकन केलेल्या आदेशाची प्रत आवश्यकता असल्यास, 

ज्येष्ठता यादीतील जेष्ठता क्रमांक नमूद करावा.



वरील शिक्षणाधिकारी यांचा आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.