महत्त्वाचे अपडेट - स्टुडंट पोर्टल मधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्यावत करणे बाबत शिक्षण संचालकांचे पत्र

स्टुडंट पोर्टल मधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्यावत करणे बाबत शिक्षण संचालकांचे पत्र.

महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी विद्यार्थी पोर्टलमधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक ची माहिती अद्यावत करणे बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना स्मरणपत्र देऊन पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ही गव्हर्नन्स अंतर्गत एन आय सी पुणे यांच्याकडून विकसित करण्यात आलेल्या स्टुडन्ट पोर्टलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाची नोंद घेण्यात आली आहे. तथापि काही विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक अ आधार कार्ड वरील माहिती मध्ये त्रुटी तफावत असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत आपले विभागात आधार नोंदणी व अद्यावतीकरणाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी बाबतचा पाक्षिक अहवाल सादर करणे बाबत याअगोदरच्या पत्रांमुळे आपणास कळविण्यात आले होते. तसेच वेळोवेळी विसीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांची सरळ प्रणालीमधील माहिती त्यांच्या आधार क्रमांकानुसार अद्यावत करावयाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु अद्याप आपणाकडून सदर प्रगतीचे अहवाल अप्राप्त आहेत सदरची बाब अत्यंत खेदजनक असून राज्याचा एकत्रित प्रगती अहवाल माननीय आयुक्त शिक्षण यांना तसेच शासनास सादर करणे शक्य झाले नाही.

तरी आपल्या अधिनिस्त सर्व जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या सर्व आस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड संदर्भातील माहितीचा आढावा घेऊन सरलप्रणालीमध्ये आधार नोंदणी आधार दुरुस्ती अद्यावत करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी तसेच यापुढे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी सदरील अहवाल कालावधी नमूद करून संचालनायक सोबत जोडलेल्या विहित एक्सल नमन्यात सादर करावे याबाबत स्मरणपत्रे काढावी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. अहवाल दर पंधरा दिवसांनी नियमित सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली असणार याची कटाक्षाने नोंद घ्यावी.

वरील प्रमाणे निर्देशक माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी विभागीय उपसंचालक सर्व विभाग यांना दिले आहेत.


वरील शिक्षण संचालक प्राथमिक यांचे स्मरणपत्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.