जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या शिक्षकांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रस्तावाची छाननी करण्यासाठी तालुका निहाय समिती स्थापन करणे बाबत शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश

त्रिस्तरीय समितीद्वारे होणार शिक्षकांनी ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदलीसाठी भरलेल्या माहितीची पडताळणी.


 जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या शिक्षकांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रस्तावाची छाननी करण्यासाठी तालुका निहाय समिती स्थापन करणे बाबत शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश.


पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये संदर्भात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

सदर आदेशानुसार जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या शिक्षकांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रस्तावांची छाननी करण्यासाठी तालुकास्तरीय तालुका निहाय समिती स्थापन करणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत.


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसाठी सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनी ची नियुक्ती करण्यात आलेली असून सदर ऑनलाईन प्रक्रियेत लीला अंतर्गत बदली होणे कमी पुणे जिल्ह्यातील बदली प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या शिक्षकांचे ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रस्तावांची त्या अनुषंगिक कागदपत्रांची छाननी करण्यासाठी तालुकास्तरावर तालुका निहाय त्रिस्तरीय समिती खालील प्रमाणे स्थापन करण्यात यावी.

त्यानुसार सदर समितीमध्ये खालील प्रमाणे सदस्य असावेत.

1) तालुका आरोग्य अधिकारी - अध्यक्ष.

2) केंद्रप्रमुख - सदस्य.

3) गटशिक्षणाधिकारी - सदस्य सचिव.

तरी वरील प्रमाणे आपल्या तालुक्यात ती स्तरीय समिती गठित करून त्यानुसार संबंधित सदस्य अध्यक्ष यांना कळवावे व बदली प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या शिक्षकांचे ऑनलाईन भरलेल्या अर्जांची प्रस्तावांची त्यानुषंगिक कागदपत्रांची छाननी कामकाज तात्काळ सुरू करावी जेणेकरून संबंधित बदलीस पात्र शिक्षक खोटी माहिती भरून ऑनलाईन बदलीचा लाभ मिळू शकणार नाही.

तरी उपरोक्त प्रमाणे तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी पुणे जिल्हा परिषदेतील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.