TET 2019 गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादन रद्द करणे व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंध करणे परीक्षा परिषदेच्या आयुक्तांचे आदेश.

टीईटी परीक्षा गैर मार्गाने पात्र होणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का! 


2019 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये मिळवलेले प्रमाणपत्र रद्द.


यानंतर होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा कधीही देता येणार नाही.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 19 जानेवारी 2020 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटीईटी घेतली होती या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगामध्ये गैरप्रकारांमध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादन रद्द करणे व सदर उमेदवारांना शास्ती करणे बाबत दिनांक तीन ऑगस्ट 2022 रोजी परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी उमेदवारांच्या यादीसह त्यांना करण्यात आलेल्या शास्ती संदर्भात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.


सन 2019 20 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरवहाराबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे विविध कलम अंतर्गत व माहिती तंत्रज्ञान 2000 कलम 66 अंतर्गत महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या इतर विधी निश्चित परीक्षांमध्ये होणाऱ्या गैर प्रकारास प्रतिबंध अधिनियम 1990 सुधारित कलम सात व आठ अन्वय दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासा दरम्यान परीक्षार्थींच्या उत्तर पत्रिकांची बसून तपासणी करून घेतली असतात त्यात असे निष्पन्न झाले की 7880 उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केले आहेत. म्हणजे प्रत्यक्षात ते अपात्र असताना गैरप्रकार करून स्वतः पात्र करून घेतले आहे.

अशाच स्वरूपाच्या व्यापम घोटाळ्यात मान्य सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले असतील आणि घोटाळ्यामध्ये सहभागी उमेदवारांना वेगळे करता येत असेल तर अशा परीक्षा रद्द करू नये तर अशा उमेदवारांचे निकाल वेगळे काढता आले तर कोणतेही कारणे दाखवा नोटीस न देता त्यांची निकाल रद्द करावे असे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राज्य समिती सभा क्रमांक 123 ठराव क्रमांक 350 दिनांक 24 जून 2022 अन्वय पुढीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आले आहे.

नमूद 7500 उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र असताना देखील किंवा अंतिम निकालामध्ये सदर उमेदवारांना पात्र जाहीर करण्यात आलेले आहेत सभा सदर उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे.

उमेदवारांची सदर परीक्षेतील संपूर्ण संपादन रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंध करणे.

परिशिष्ट ब मध्ये नमूद 293 उमेदवार हे अंतरिम किंवा अंतिम निकालामध्ये अपात्र आहे त्यामुळे त्यांना परीक्षा परिषदेच्या विहित पद्धतीने प्रमाणपत्र वितरित झाले ही कथेतील त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले अथवा प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. सब सदर उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे.


उमेदवारांची सदर परीक्षेतील संपूर्ण संपादन रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंध करणे.

परिशिष्ट का मध्ये नमूद 87 उमेदवार, आरोपीकडून तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी विशेष केले आहे त्यापैकी सहा उमेद वारांची 7500 उमेदवारांमध्ये समावेश आहेत उर्वरित 81 उमेदवारांपैकी 76 उमेदवार हे अंतरिम किंवा निकालामध्ये अपात्र आहेत व तीन उमेदवार परीक्षेत उपस्थित आहेत त्यामुळे सदर सर्व उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कार्यवाही कर्तव्य करण्यात येत आहे.

उमेदवारांची सदर परीक्षेतील संपूर्ण संपन्न रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत कायमस्वरूपी तसेच प्रतिबंध करणे.

परिशिष्ट क मध्ये नमूद दोन उमेदवारांची परीक्षेसाठी नोंदणी झालेली नाही याची माहिती परीक्षेच्या कोणत्याही माहितीशी जुळत नाही याबाबत पुढील प्रमाणे शास्ती प्रस्तावित करण्यात येत आहे.


यापुढे घेण्यात येणारे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंध करणे.

एकूण 7880 पैकी सहा उमेदवारांची नावे दुबार असल्याने अंतिम कार्यवाही उपरोक्त ठळक प्रमाणे एकूण 7874 उमेदवारांबाबत करणेस मान्यता देण्यात आलेली आहे.

आत्ता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम 1998 भाग दोन प्रकरण पाच मधील कलम 8 उपनियम दोन यामध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून सोबत दिलेल्या परिशिष्ट अ ब क समाविष्ट परीक्षार्थी उमेदवार यांचे विरुद्ध त्यांच्यासमोर नमूद केल्याप्रमाणे शासकीय निश्चित करण्यात येत आहे.
उमेदवारास केलेल्या शिक्षेबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांचे आदेश व सर्व उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.