आंतरजिल्हा बदल्या झाल्या जिल्हा अंतर्गत बदल्या देखील होणारच - ग्राम विकास मंत्री मा.गिरीश महाजन

आंतरजिल्हा बदल्या झाल्या जिल्हा अंतर्गत बदल्या देखील होणारच - ग्राम विकास मंत्री मा.गिरीश महाजन.


महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे लवकरच त्यांना आदेशही प्राप्त होतील.

जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया देखील शिक्षकांना ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज सादर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या विधान भवनात अधिवेशनादरम्यान जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले या प्रश्नांना उत्तर देताना महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री माननीय श्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.

त्यांच्या उत्तरानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा जिल्हा अंतर्गत बदलांसाठी दिनांक सात एप्रिल 2021 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णय सुधारित धोरणवीत करण्यात आले आहे शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया दिनांक एक ते 31 मे पर्यंत पूर्ण करण्याबाबत सदर शासन निर्णय मध्ये सुचित केले आहेत.

तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे सदर ऑनलाईन द्वारे बदली प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करणे शक्य झाली नाही सद्यस्थितीत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी शिक्षकांनी अर्ज सादर करण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी शिक्षकांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज सादर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.



वरील उत्तर माननीय ग्राम विकास मंत्री यांनी दिलेले असल्यामुळे आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे आता जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्यास कोणतीच अडचण उरली नाही व आजच्या ग्रामविकास मंत्र्यांनी विधान भवनात दिलेल्या उत्तरानुसार जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया देखील सुरू होणारच अशी खात्री वाटते.



आंतरजिल्हा बदल्या ह्या पुढील प्रमाणे जिल्हा नुसार येणारे व जाणाऱ्या शिक्षकांची संख्या दाखवते.



ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झालेली आहे त्या शिक्षकांना पुढील प्रमाणे ईमेल प्राप्त झालेला आहे.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.